Bank Strike: पगारवाढीसाठी बॅंक कर्मचार्‍यांचा देशव्यापी संपाचा इशारा; 31 जानेवारी ते २ फेब्रुवारी व्यवहार ठप्प होण्याची शक्यता

देशामध्ये भारतीय बॅंक महासंघ (IBA) सोबत पगारवाढी (Salary Hike) बाबत सुरू असलेल्या वाटाघाटी असफल ठरत असल्याने बॅंक कर्मचार्‍यांच्या संघटनांकडून यंदा 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारी दिवशी अशा दोन दिवसांच्या संपाची हाक दिली आहे.

Bank Bandh| (Photo Credits: PTI)

देशामध्ये भारतीय बॅंक महासंघ (IBA) सोबत पगारवाढी (Salary Hike) बाबत सुरू असलेल्या वाटाघाटी असफल ठरत असल्याने बॅंक कर्मचार्‍यांच्या संघटनांकडून यंदा 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारी दिवशी अशा दोन दिवसांच्या संपाची हाक दिली आहे. तर 2 फेब्रुवारी रोजी साप्ताहिक सुट्टी रविवार असल्याने सलग तीन दिवस बँका बंद (Bank Employee Strike) राहणार असल्याचे चिन्ह आहेत. तसेच पगारवाढीच्या मागणीवर वेळेत तोडगा न निघल्यास 1 एप्रिल पासून बेमुदत संप करण्याचा इशाराही बॅंक संघटनांनी दिला आहे. त्यामुळे तुम्हाला बँक व्यवहाराची महत्वाची कामे असल्यास ती ३१ जानेवारी रोजी उरकून घेणे फायद्याचे ठरेल.. Maharashtra Public Holiday 2020 List: महाराष्ट्र सरकारकडून 2020 मधील सार्वजनिक सुट्यांची यादी जाहीर.

प्राप्त माहितीनुसार, सध्या IBA कडून 12.25% वाढ दिली जात आहे परंतु UFBU कडून 15% पगारवाढीची मागणी आहे. या मागणीसाठीच 13 जानेवारी नव्या वेतन रचनेबाबत मीटिंग झाली होती. मात्र यात समाधानकारक निर्णय न झाल्याने इंडियन बँक असोसिएशनने युनायटेड फोरम ऑफ बँक युनियंस (UFBU), सोबत 9 प्रमुख संघटनांनी संपाची हाक संपूर्ण देशभर दिली आहे. Union Budget 2020: Income Tax कपात, विविध सवलतींसह अर्थसंकल्प २०२० मध्ये केंद्र सरकार विमा क्षेत्राला काय गिफ्ट देणार? जनतेला अपेक्षा

दरम्यान यंदा 1 फेब्रुवारी दिवशी देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प 2020 संसदेमध्ये मांडला जाणार आहे. त्यामुळे ऐन अर्थसंकल्पाच्या दिवशीचा देशभरातील बॅंकांचे व्यवहार बंद राहण्याची शक्यता आहे.