Bangladesh MP Found Dead in Kolkata: बांगलादेशातील खासदार Anwarul Azim यांचा कोलकाता येथे मृत्यू; हत्येचा आरोप, चौकशी सुरु

बांगलादेशचे अवामी लीगचे (Awami League) खासदार (एमपी) अन्वारुल अझीम (Anwarul Azim Anar) यांचा मृतदेह कोलकाता (Kolkata) येथे बुधवारी (22 मे) सापडला. त्यानंतर एकच खळबळ उडाली. अनेक तर्कवितर्क, आरोप-प्रत्यारप झाल्यानंतर या कथीत मृत्यूमागच्या कारणांचा तपास संयुक्तरित्या सुरु करण्यात आला आहे.

Anwarul Azim Anar | (Photo Credit -X, ANI)

बांगलादेशचे अवामी लीगचे (Awami League) खासदार (एमपी) अन्वारुल अझीम (Anwarul Azim Anar) यांचा मृतदेह कोलकाता (Kolkata) येथे बुधवारी (22 मे) सापडला. त्यानंतर एकच खळबळ उडाली. अनेक तर्कवितर्क, आरोप-प्रत्यारप झाल्यानंतर या कथीत मृत्यूमागच्या कारणांचा तपास संयुक्तरित्या सुरु करण्यात आला आहे. भारतात 18 मे पासून बेपत्ता असलेले बांगलादेशचे खासदार अन्वारुल अझीम अनार यांची बुधवारी पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे कथीत हत्या (Bangladesh MP Anwarul Azim Found Dead in Kolkata) झाल्याचे आढळून आले. भारत आणि बांगलादेशच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास संयुक्तरित्या सुरु केला आहे. दरम्यान, अझीम यांच्या कुटुंबातील सदस्य आवश्यक औपचारिकता पूर्ण करण्यासाठी कोलकाता येथे पोहोचणार आहेत. त्यांची व्हिसाची प्रक्रिया सध्या सुरू आहे. दिल्लीतील दूतावासातील बांगलादेशचे प्रेस मंत्री शबान महमूद यांनी परिस्थितीवर भाष्य करताना सांगितले की, "भारत हा आमचा जुना आणि विश्वासू मित्र देश आहे आणि आम्ही भारतीय अधिकाऱ्यांकडून अधिक तपशीलांची अपेक्षा करत आहोत."

बांगलादेशच्या गृहमंत्र्यांकडून अन्वारुल अझीम यांच्या मृत्यूची पुष्टी

बांगलादेशचे गृहमंत्री असदुझ्झमन खान यांनी ढाका येथे पत्रकार परिषदेत अझीमच्या मृत्यूची पुष्टी केली आणि ही हत्या असल्याचे वर्णन केले. बांगलादेशी वृत्तपत्र डेली स्टारने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, "आतापर्यंत आम्हाला कळले आहे की, यात सहभागी सर्व मारेकरी बांगलादेशी आहेत. ही नियोजित हत्या होती." बांगलादेश पोलिसांनी या प्रकरणाशी संबंधित तीन संशयितांना अटक केली असल्याचा दावाही या वृत्तपत्राने केला आहे.(हेही वाचा, Molested Schoolgirl In Bangladesh: शाळकरी मुलीचा पाठलाग करून विनयभंग; भयावह घटनेचा Video व्हायरल, आरोपीला अटक)

खासदार 13 मे बासून बेपत्ता

झिनेदह-4 मतदारसंघातील अवामी लीगचे खासदार अजीम 12 मे रोजी भारतात दाखल झाले होते आणि 13 मे रोजी दुपारी कोलकाताजवळील बिधाननगर येथे शेवटचे दिसले होते. जिथे ते मित्रांसह वैद्यकीय तपासणीसाठी गेले होते. कोलकात्याच्या विधाननगरमधील एका कौटुंबिक मित्राने नमूद केले की अझीमने दिल्लीला जाण्याची योजना आखली होती, परंतु 13 मे पासून त्याच्याशी प्रत्यक्ष उपस्थिती किंवा थेट संपर्क झालेला नाही. फक्त मोबाईल संदेशांची देवाणघेवाण करून त्याचा इच्छित प्रवास दर्शविला गेला.

अजीमच्या मुलीने तिच्या वडिलांशी संपर्क साधता येत नसल्याची माहिती दिल्यानंतर संवादाच्या अभावामुळे चिंतित असलेल्या गोपाल विश्वास या कौटुंबिक मित्राने बिधाननगरमधील बारानगर पोलिस ठाण्यात ते हरवल्याची तक्रार दाखल केली. 18 मे 2024 च्या तक्रारीनुसार, अझीमने 16 मे रोजी सकाळी त्याच्या सहाय्यकाला कॉल केला होता परंतु तो संपर्क करू शकला नाही. त्यानंतर त्याच्या स्वीय सहाय्यकाने त्याच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले. अझीमच्या मुलीने संपर्क साधल्यानंतर विश्वास यांनी अझीमच्या सर्व परिचितांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु संपर्क होऊ शकला नाही. यानंतर विश्वास यांनी बेपत्ता व्यक्तीची तक्रार नोंदवली.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now