Balasaheb Thackeray Jayanti: बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त नरेंद्र मोदी, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, यांच्यासहित भाजप नेत्यांचे अभिवादनपर ट्विट
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासहित भाजपच्या (BJP) नेत्यांनी आज बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त खास ट्वीट करुन
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray Jayanti) यांची आज 94वी जयंती आहे. थेट सक्रिय राजकारणात सहभाग नसूनही दबदबा टिकवून ठेवणारे बाळासाहेब यांचे नेतृत्व बहुआयामी होते. व्यंगचित्रकार, पत्रकार, संपादक, राजकारणी, उत्तम वक्ते, हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे काही पैलू सर्वज्ञात आहेत. बाळासाहेबांचे व्यासपीठावरील बोल जितके जहाल होते तितकाच दिलखुलास स्वभाव त्यांच्या मैत्रीच्या नात्यात दिसून येतो. राजकारण, समाजकारण सोडल्यास क्रीडा व कलाक्षेत्रातही त्यांचे अनेक मित्र होते. हिंदुत्व (Hindutva) आणि मराठी बाण्याचा बाळासाहेबांचा लढा हा महाराष्ट्राच्या राजकारणात अत्यंत महत्वाचा आहे. आज त्यांच्या जयंती निमित्त मुंबईत शिवतीर्थावर अनेकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे तर सोशल मीडियावर देखील राजकीय मंडळींनी ट्विटच्या माध्यमातून त्यांना अभिवादन केले आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासहित भाजपच्या (BJP) नेत्यांचा देखील समावेश आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सुद्धा एक खास व्हिडीओ शेअर करून बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहिली आहे.
नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विट मध्ये "लोककल्याणाचे प्रश्न उपस्थित करण्यास ज्यांनी कधीही मागेपुढे पाहिले नाही, लाखो लोकांना प्रेरणा दिली, ते नेहमीच भारतीय नीतिनियम आणि मूल्ये यांचा अभिमान असणार आहेत असे म्हणत बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहिली आहे.
नरेंद्र मोदी ट्विट
नितीन गडकरी ट्विट
दरम्यान, महाराष्ट्र सत्ता संघर्षानंतर भाजप व शिवसेनेची समीकरणे बदलली असली तरीही न माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेबांना मात्र आवर्जून श्रद्धांजली वाहिली आहे.
देवेंद्र फडणवीस ट्विट
चंद्रकांत पाटील ट्विट
पंकजा मुंडे ट्विट
राधाकृष्ण विखे पाटील ट्विट
आज बाळासाहेबांच्या जयंती निमित्त मुंबईत मनसे आणि शिवसेनेतर्फे दोन वेगळ्या खास कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, मनसेचे महा अधिवशेन तर शिवसेनेचा जल्लोष सोहळा असे या कार्यक्रमाचे स्वरूप आहे.