Bakra Eid 2019: राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी यांच्यासह दिग्गजांनी दिल्या ईदच्या शुभेच्छा
ईद-उल-जुहा प्रेम, बंधुभआव आणि मानवतेचे प्रतिक आहे. ही मुल्ये आपल्या संस्कृतीचे प्रतिक आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनही देशवासियांना आणि मुस्लिम बांधवांना ईदच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
देशभरात आज (12 ऑगस्ट 2019) इस्लामधर्मिय बांधव बकरी ईद (Bakra Eid) हा सण मोठ्या उत्साहात साजरा करत आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind), पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi), राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासह अनेक दिग्गजांनी बकरी ईद सणानिमित्त मुस्लिम बांधवांना ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. इस्लाम धर्मियांचा पवित्र महिना रमजान ईद नंतर सुमारे 70 दिवसांनंतर हजरत इस्माइल (Hazrat Ismail) यांच्या कुर्बानीच्या स्मरणार्थ बकरी ईद साजरी केली जाते. मुंबई, दिल्ली आणि देशभरातील अनेक शहर आणि गावांमध्ये मुस्लिम बांधवांनी आज ईदनिमित्त प्रिय अल्लाला नमाज अदा करत एकमेकांच्या गळाभेटी घेतल्या.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा देताना म्हटले आहे की, ईद-उल-जुहा निमित्त देशवासियांना खास करुन मुस्लिम बांधवांना शुभेच्छा. ईद-उल-जुहा प्रेम, बंधुभआव आणि मानवतेचे प्रतिक आहे. ही मुल्ये आपल्या संस्कृतीचे प्रतिक आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनही देशवासियांना आणि मुस्लिम बांधवांना ईदच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. (हेही वाचा, Bakra Eid Mubarak Wishes: बकरी ईदच्या शुभेच्छा मराठमोळ्या ग्रिटिंग्स, Wishes,GIFs, Images, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन द्विगुणित करा ईदचा आनंद)
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे ट्विट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विट
इस्लाम धर्मामध्ये ईद उल अजहाला सुन्नते इब्राहीम असेही म्हटले जाते. इस्लामने सांगितल्याप्रमाणे अल्लाने हजरत इब्राहिम अलैस्लाम यांची परिक्षा घेण्याच्या उद्देशाने आपली प्रिय बाब कुर्बानी देण्याचा आदेश दिला. हजरत इब्राहीम अलैस्लाम यांना वाटले की, आपल्याकडे सर्वात प्रिय काय असेल तर आपला मुलगा. त्यामुळे त्यांनी आपला मुलगा इस्माईल याची कुर्बानी देण्याचा विचार केला.
राहुल गांधी यांचे ट्विट
अल्लाचा आदेश पाळताना आपल्या मुलाची कुर्बानी द्यावी लागत असताना प्रेमामुळे त्यात खंड येऊ नये. यासाठी इब्राहिम अलैस्लाम यांनी आपल्या डोळ्याला पट्टी बांधली आणि मुलाची कुर्बानी देण्यासाठी तयार झाले. त्यांनी कुर्बानी दिली. त्यानंतर डोळ्यावरची पट्टी काढली. पण, समोर जे दिसत होते ते भलतेच होते. त्यांचा मुलगा इस्लाम समोर उभा होता. त्यांनी एका बकऱ्याची कुर्बानी दिली होती. अल्लाने काही क्षणात इब्राहिम यांचा मुलगा इस्माईल याच्या जागी एका बकऱ्याची कुर्बानी दिली. तेव्हापासून इस्लाम धर्मात कुर्बानी देण्याची प्रथा चालत आली आहे.