#VocalForLocal: स्वदेशी उत्पादनांसाठी बाबा रामदेव लवकरच लाँच करणार ऑनलाईन पोर्टल 'Order Me'
तसेच ऑर्डर केल्यानंतर काही तासांतच हे प्रोडक्टस तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील. येथे तुम्हाला घरपोच सेवाही मोफत दिली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 'Vocal for Local' होण्यास म्हणजेच लोकलसाठी व्होकल होण्यास सांगितले आहे. याचाच अर्थ केवळ लोकलसाठी आवाज न बनता लोकल म्हणजे स्वदेशी वस्तू खरेदी करुन देशासाठी अभिमान बाळगायचा आहे असेही त्यांना आपल्या भाषणात म्हटले होते. याच धर्तीवर योगगुरु बाबा रामदेव (Baba Ramdev) यांच्या पतंजली आयुर्वेद स्वदेशी उत्पादनांसाठी स्वत:चे ई कॉमर्स पोर्टल लाँच करणार आहेत. इकॉनॉमिक्स टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार 'Order Me' असे या पोर्टल चे नाव असणार आहे. अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारखे हे पोर्टल काम करेल.
या पोर्टलवर तुम्हाला पतंजलिचे सर्व प्रोडक्ट्स खरेदी करता येईल. तसेच ऑर्डर केल्यानंतर काही तासांतच हे प्रोडक्टस तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील. येथे तुम्हाला घरपोच सेवाही मोफत दिली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. Coronavirus पासून सुरक्षित राहण्यासाठी योगगुरु बाबा रामदेव यांचा प्राणायाम करण्याचा सल्ला; सुचवला 'हा' खास उपाय (Watch Video)
इकॉनॉमिक्स टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार या पोर्टलद्वारे मोफत वैद्यकीय सल्लादेखील देण्यात येणार आहे. पतंजलीशी निगडीत १ हजार ५०० जणांना याद्वारे संपर्क साधता येणार आहे. या महिन्याच्याच अखेरिस हे पोर्टल लाँच होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आचार्य बाळकृष्ण यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार आम्ही स्वदेशी वस्तूंचा वापर वाढवण्यासाठी काम करत आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं. तसेच या पोर्टलशी सर्व स्थानिक दुकानदार आणि रिटेलर्संना जोडले जाईल असेही सांगण्यात येत आहे.
कोरोना सारख्या घातक आजाराशी सामना करण्यासाठी भारत सरकार प्रयत्नशील असताना आता बाबा रामदेव (Baba Ramdev) यांनी कोरोना पासून सुरक्षित राहण्यासाठी खास सल्ला दिला आहे. रोगप्रतिकारक शक्ती कमजोर असणाऱ्या व्यक्तींना कोरोनाचा धोका अधिक आहे. तसंच कोरोना व्हायरस कमजोर रोगप्रतिकारशक्ती असलेल्या व्यक्तींच्या हृदयावर आणि सर्कुलेशन सिस्टमवर परीणाम करत असल्याचे बाबा रामदेव यांनी म्हटले आहे. मात्र इम्युनिटी सिस्टम मजबूत असल्यास कोरोनापासून तुम्ही सुरक्षित राहू शकता असेही ते म्हणाले.