Nitin Raut | (Photo Credits: Twitter)

उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यातील आजमगढ (Azamgarh) जिल्ह्यातील तरवा येथील बांसगाव येथे सरपंचाची हत्या करण्यात आली. त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये राजकारण चांगलेच तापले आहे. काँग्रेस पक्षाने सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. दरम्यान, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी दिलेल्या निर्देशावरुन काँग्रेसचे एक शिष्ठमंडळ हत्या झालेल्या सरपंचाच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी पोहोचले. या शिष्ठमंडळात महाराष्ट्राचे उर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut यांचाही समावेश आहे. मात्र, उत्तर प्रदेश प्रशासनाने या शिष्ठमंडळास संरपंचांच्या परीवारास भेटण्यास परवानगी नाकारली आहे. त्यामुळे नितीन राऊत आणि त्यांच्यासोबत असलेले इतर काँग्रस नेते आंदोलन करत धरणे धरुन बसले आहेत. राऊत यांच्यासोबत प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अजय कुमार लल्लू, राज्यसभा खासदार पीएल पुनिया यांचा समावेश आहे.

प्राप्त माहितीनुसार, काँग्रेसचे एक शिष्ठमंडळ पीडित कुटुंबीयांना भेटण्यासाठी बुधवारी रात्री जनपद येथे पोहोचले. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अजय कुमार लल्लू, राज्यसभा खासदार पीएल पुनिया हे सर्किट हाऊस येथे थांबले होते. तर नितीन राऊत आणि शिष्टमंडळातील इतर नेते गुरुवारी पोहोचणार होते. सर्व जण एकत्र येऊन बासगांव येथे जाणार होते. मात्र, प्रशासनाने त्यांना आजवले पुढे जाऊ दिले नाही. त्यामुळे नाराज झालेल्या काँग्रेस नेत्यांनी सर्किट हाऊस येथे धरणे धरले आणि शासन-प्रशासन यांच्याविरोधात घोषणाबाजी सुरु केली.

बांसगावचे सरपंच सत्यमेवर जयते यांची काही दिवसांपूर्वीच गोळी मारुन हत्या करण्यात आली होती. त्यानंतर जमलेला जमाव आणि चेंगराचेंगरीत एका लहान मुलाचा मृत्यू झाला. दोन्ही मृत्यूंमुळे लोकांच्य भावना तीव्र झाल्या. या वेळी हिंसाचार झाला. काही गाड्या जाळण्या आल्या. तर काही ठिकाणी दगडफेक झाली. (हेही वाचा, शिवसेना खासदार संजय राऊत म्हणतात 'किस्मत पे इतना नाज ना करे..हमने बारिशों मे भी जलते हुए मकान देखे है')

दरम्यान, बांसगाव येथील हत्या झालेल्या सरपंचांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन करण्यासाठी काँग्रेसचे एक शिष्ठमंडळ निघाले होते. या शिष्टमंडळात महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री नितिन राउत , मध्य प्रदेशचे प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अजय कुमार लल्लू, राज्य सभा सदस्य पीएल पूनिया, राष्ट्रीय उपाध्यक्ष बुजलाल खाबरी (अनुसूचित सेल) प्रदीप नरवाल कोआर्डिनेटर उत्तर प्रदेश, आलोक प्रसाद प्रदेश अध्यक्ष (अनुसूचित सेल), आरके चौधरी यांचा समावेश आहे.

दरम्यान, आगोदरपासूनच काहीसे सावध असलेल्या प्रशासनाने बुधवारी रात्रीच एक आदेश काढून संबंधित परिसरात जाण्यास मनाई आदेश लागू केला. कायदा व सुव्यस्थेचा पर्श्न निर्माण होऊ नये यासाठी हा आदेश लागू करण्यात आल्याचे स्पष्टीकरण प्रशासनाने दिले आहे.

वृत्तसंस्था आयएएनएसने दिलेल्या वृत्तानुसार, प्रशासनाने काँग्रेस नेते थांबलेल्या सर्किट हाऊस बाहेर मोठ्या प्रमाणावर पोलीस फाटा तैनात केला आहे. त्यामुळे परिसराला छावनीचे स्वरुप आले आहे. काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनाही या ठिकाणी प्रवेश मिळाला नाही. दरम्यान, काँग्रेस नेते आणि एडीएम प्रशासन यांच्यात चर्चा सुरु असल्याचे वत्त आहे.