अयोध्या नगरी मध्ये पुन्हा रंगणार प्राण प्रतिष्ठेचा सोहळा; एकाच वेळी 8 मंदिरातील पूजेची सुरूवात शरयू जल कलश यात्रेने होणार

5 जून रोजी होणाऱ्या अभिषेक समारंभात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.

Ayodhya Ram Mandir (File Photo)

अयोध्या नगरी राम जन्मभूमी मंदिराच्या उद्घाटनाच्या सोह्ळयानंतर आता पुन्हा अजून एक सोहळ्यासाठी सज्ज होत आहे. आता नव्याने बांधलेल्या भव्य रामजन्मभूमी मंदिर संकुलात, तीन दिवसांच्या मोठ्या धार्मिक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. या उत्सवाची सुरुवात 2 जून रोजी शरयू जल कलश यात्रेने होईल आणि भव्य अभिषेक (प्राण प्रतिष्ठा) विधी 3 जून ते 5 जून दरम्यान होतील. अशी माहिती देण्यात आली आहे.

श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी दिलेल्या माहितीनुसार, संकुलातील आठ नव्याने बांधलेल्या मंदिरांची एकाच वेळी प्राण प्रतिष्ठापना होईल. या सोहळ्यात एकाच वेळी सगळीकडे होणार्‍या अभिषेकाचे थेट प्रक्षेपण कॅमेरे आणि एलईडी स्क्रीन वापरून केले जाईल, ज्यामुळे visual uniformity आणि spiritual unity राहणार आहे. या अनोख्या उपक्रमाचे उद्दिष्ट सर्व मंदिरांमध्ये केल्या जाणाऱ्या विधींमध्ये सातत्य आणि सुसंवाद राखणे आहे.

कोणत्या आठ देव-देवतांची प्रतिष्ठापना केली जाणार?

ईशान्य दिशेला शिवलिंग, अग्नेय दिशेला गणपती, दक्षिण मध्य भागी महाबली हनुमान, नैऋत्याला सूर्यदेव, वायव्य दिशेला देवी भगवती, उत्तर मध्य भागी देवी अन्नपूर्णा, मुख्य मंदिराच्या पहिल्या मजल्यावर श्री राम दरबार तर दक्षिण पश्चिम परिकोटा भागात शेषावतार स्थापन केला जाणार आहे.

2-5 जून दरम्यान कसे असतील धार्मिक विधी आणि त्यांच्या वेळा

  • 2 जून दिवशी शरयू जल कलश यात्रा असणार आहे जी जुन्या पुलाच्या पूर्व किनाऱ्यापासून दुपारी ४ वाजता सुरू होईल.
  • 3 ते 5 जून दरम्यान सकाळी ६:३० ते संध्याकाळपर्यंत तीन दिवसांची पूजा आणि विधी संपन्न होणार आहेत.
  • 5 जून दिवशी प्राण प्रतिष्ठा सोहळा सकाळी ठीक 11.25 वाजता होईल. सर्व विधी त्याच दिवशी दुपारी 1 वाजेपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.

5 जून रोजी होणाऱ्या अभिषेक समारंभात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement