राम मंदिर ट्रस्टला मोदी सरकारकडून 1 रुपयांचे दान

या ट्रस्टमध्ये 15 सदस्य असणार असून त्यामध्ये 9 स्थायी आणि 6 नामांकित सदस्य असणार आहेत

राम मंदिर (Photo Credits: PTI)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सरकारने बुधवारी अयोध्या (Ayodhya) राम मंदिर (Ram Mandir) उभारणीसाठी 'श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र' ट्रस्टची स्थापन करण्यात आल्याचे जाहिर केले. या ट्रस्टमध्ये 15 सदस्य असणार असून त्यामध्ये 9 स्थायी आणि 6 नामांकित सदस्य असणार आहेत. ट्रस्ट स्थापन झाल्यानंतर केंद्र सरकारकडून 1 रुपयांचे दान करण्यात आले आहे. ट्रस्टला देण्यात आलेले हे पहिलेच दान आहे.

मोदी सरकारने ट्रस्टला दान देत असे म्हटले आहे की, स्थापन करण्यात आलेल्या ट्रस्टने अयोध्येत उभारण्यात येणाऱ्या भव्य राम मंदिरच्या दिशेने काम करण्यास सुरुवात करतील. केंद्र सरकारकडून देण्यात आलेले हे दान गृहमंत्रालयाचे सचिव डी. मुर्मू यांनी दिले आहे. तर नरेंद्र मोदी यांनी बुधवारी लोकसभेत राम मंदिर उभारणीसाठी ट्रस्टची स्थापन करण्यात आली असल्याचे जाहीर केले. त्यानंतर मोदी यांच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आल्यानंतर त्यांचे अनेक राजकिय नेत्यांनी ट्वीटरच्या माध्यमातून अभिनंदन केले.(राम मंदिर उभारण्यासाठी ट्रस्टची स्थापना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसदेत घोषणा)

तर ज्येष्ठ विधिज्ञ केशवन अय्यंगार परासरण हे ट्रस्टचे सदस्य असणार आहेत. त्यांच्यासोबत जगतगुरू शंकराचार्य, जगतगुरू माधवानंद स्वामी, युगपुरुष परमानंदजी महाराज हे देखील सदस्य असणार आहेत. तर पुण्यातील गोविंददेव गिरी, अयोध्येतील डॉक्टर अनिल मिश्रा, कामेश्वर चौपाल आणि निर्मोही आखाड्याचे धीरेंद्र दास यांच्या नावांचा देखील समावेश आहे.