Ayodhya Ram Mandir Timings: अयोध्या राम मंदिर दर्शनासाठी आता रात्री 10 पर्यंत खुले राहणार; भाविकांच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर निर्णय

काल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील हेलिकॉप्टर मधून भाविकांच्या गर्दीचा आढावा घेत प्रशासनाला योग्य पावलं उचलण्यासाठी आदेश दिले आहेत.

रामलल्ला | File Image

अयोध्येचे राम मंदिर (Ayodhya Ram Mandir) भाविकांसाठी खुलं झाल्यानंतर पहिल्या दिवसापासून भाविकांची रामलल्लांच्या दर्शनासाठी (Ram Lalla Darshan) मोठी गर्दी उसळली आहे. अयोध्येमध्ये भाविकांना सुरक्षित दर्शन घेता यावं यासाठी पोलिस यंत्रणा चोख ठेवण्यात आली आहे. काल गर्दीला नियंत्रित ठेवताना पोलिसांची तारांबळ उडाल्यानंतर आता मंदिर प्रशासनाने रामलल्लांच्या दर्शनाची वेळ वाढवली आहे. अयोद्धेमध्ये आता संध्याकाळी 7 ऐवजी रात्री 10 वाजेपर्यंत भक्तांना दर्शन घेता येणार आहे. सकाळच्या सत्रातही 7 ते 11.30 या वेळेत रामलल्लांचे दर्शन घेता येणार आहे.

रामभक्तांची गर्दी पाहता अखेर मंदिर प्रशासनाला अयोध्येच्या राम जन्मभूमीच्या मंदिराची वेळ वाढवावी लागली आहे. अधिकृत सूत्राच्या माहितीनुसार, दिवसाला सुमारे 5 लाख भाविक रामलल्लांचे दर्शन घेत आहेत. वाढती गर्दी पाहता आता अयोध्या राम मंदिर  जिल्हा प्रशासनाने भाविकांना 10-15 दिवसांनंतर दर्शनाला येण्याची विनंती केली आहे. सध्या अयोद्धेमध्ये कडाक्याची थंडी आहे पण अशा वातावरणामध्येही भाविक पहाटे 4-5 वाजल्यापासून दर्शन घेण्यासाठी रांगेमध्ये उभे आहेत. नक्की वाचा: Ayodhya Ram Mandir Aarti Passes: अयोद्धा राम मंदिरात ऑनलाईन, ऑफलाईन आरती पास देण्यास सुरूवात; इथे पहा दर्शन, आरतीच्या वेळा आणि पास कसा मिळवाल? 

सध्या मंदिरात भाविकांना सुरक्षित दर्शन घेता यावं म्हणून सुमारे 8 हजार पोलिस दलातील कर्मचारी तैनात आहेत. Director General of Police (Law and Order) प्रशांत कुमार आणि Principal Secretary (Home) संजय प्रसाद स्वतः मंदिरामध्ये जातीने उपस्थित राहून सुरक्षेचा आढावा घेत आहेत. काल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील हेलिकॉप्टर मधून भाविकांच्या गर्दीचा आढावा घेत प्रशासनाला योग्य पावलं उचलण्यासाठी आदेश दिले आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif