Uttarakhand Avalanche: उत्तराखंडमध्ये हिमस्खलन, 10 गिर्यारोहकांचा मृत्यू, शोधमोहीम अद्यापही सुरुच

हिमस्खलनात दहा प्रशिक्षणार्थी गिर्यारोहकांचा (Mountaineers ) मृत्यू झाला. मदत आणि बचाव कार्य वेगाने सुरु आहे. आतापर्यंत आठ जणांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे.

Avalanche | ( Photo Credits: Pixabay.com)

उत्तराखंड (Avalanche in Uttarakhand) राज्यातील पर्वतरांगांमध्ये आज (मंगळवार, 4 ऑक्टोबर) मोठ्या प्रमाणावर हिमस्खलन (Avalanche )झाले. हिमस्खलनात दहा प्रशिक्षणार्थी गिर्यारोहकांचा (Mountaineers ) मृत्यू झाला. मदत आणि बचाव कार्य वेगाने सुरु आहे. आतापर्यंत आठ जणांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. आणखी 11 जणांचा शोध घेतला जात आहे. मदत, बचाव आणि शोधमोहीम अद्यापही सुरुच आहे. या प्रशिक्षणार्थींनी नावनोंदणी केलेल्या गिर्यारोहण संस्थेच्या प्रमुखाने दुर्घटनेची पुष्टी केल्याचे वृत्त 'प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया' या वृत्तसंस्थेने दिली आहे.

हिमस्खलनात मृत्यूमुखी पडलेलेले सर्व प्रशिक्षणार्थी उत्तरकाशी येथील नेहरू पर्वतारोहण (Nehru Mountaineering Institute) संस्थेतील आहेत. उत्तराखंडचे पोलीस प्रमुख अशोक कुमार यांनी माहिती देताना सांगितले की, भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर बचाव कार्यात मदत करत आहेत. आज सकाळी सकाळी 9 वाजता 16,000 फूट उंचीवर हिमस्खलन झाले. यात गिर्यारोहकांचा मृत्यू झाला.

एका बचाव अधिकाऱ्याने सांगितले की, जखमी प्रशिक्षणार्थींना जवळच्या 13,000 फूट उंचीवर असलेल्या हेलिपॅडवर आणि नंतर राज्याची राजधानी डेहराडूनला नेण्यात येत आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या कार्यालयाने सांगितले की, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, राज्य आपत्ती प्रतिसाद दल आणि इंडो-तिबेट सीमा पोलिसांचे पथक बचाव कार्याचा भाग आहेत. (हेही वाचा, Uttarakhand: उत्तराखंमध्ये भीषण अपघात; 22 लोकांचा मृत्यू, 6 जखमी, यात्रेकरूंनी भरलेली बस दरीत कोसळली)

"द्रौपदीच्या दांडा-2 पर्वत शिखरावर हिमस्खलनात अडकलेल्या प्रशिक्षणार्थींना लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी जिल्हा प्रशासन, एनडीआरएफ, एसडीआरएफ, आर्मी आणि आयटीबीपीच्या जवानांसह एनआयएमच्या टीमद्वारे जलद मदत आणि बचाव कार्य केले जात आहे," असे मुख्यमंत्री कार्यालयाने ट्विट केले.

मुख्यमंत्री कार्यालयाने म्हटले आहे की, त्यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी बोलून लष्कराची मदत मागितली आहे. "केंद्राने सर्व मदतीचे आश्वासन दिले आहे, असल्याची माहिती मख्यमंत्री कार्यालयाने नंतर दिली.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif