Assam-Mizoram Border Dispute: असम-मिझोराम सीमेवर तणाव कायम, केंद्रीय सुरक्षा दल सतर्क भूमिकेत
असम आणि मिझोराम (Assam-Mizoram Border Dispute) या राज्यातील पोलीस दलामध्ये झालेल्या रक्तरंजीत संघर्षानंतर तब्बल पाच दिवसांनी दोरी राज्याती सीमेवर काहीशी तणावपूर्ण शांतता पाहायला मिळत आहे. पूर्वेकडील या दोन्ही राज्यांमध्ये आता काहीशी शांतता असली तरी केंद्रीय सुरक्षा दल (Central Security Forces) अलर्ट मोडवर आहे.
असम आणि मिझोराम (Assam-Mizoram Border Dispute) या राज्यातील पोलीस दलामध्ये झालेल्या रक्तरंजीत संघर्षानंतर तब्बल पाच दिवसांनी दोरी राज्याती सीमेवर काहीशी तणावपूर्ण शांतता पाहायला मिळत आहे. पूर्वेकडील या दोन्ही राज्यांमध्ये आता काहीशी शांतता असली तरी केंद्रीय सुरक्षा दल (Central Security Forces) अलर्ट मोडवर आहे. चार-पाच दिवसांपूर्वी घडलेल्या घटनांमुळे दोन्ही राज्यांतील तणाव ध्यानात घेऊन कंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांना अलर्ट मोडवर राहण्याचे आदेश असल्याचे समजते. वृत्तसंस्था आयएनएसने दिलेल्या वृत्तानुसार, कछार जिल्ह्याचे एसपी रमनदीप कौर आणि उपायुक्त किर्ती जल्ली सुरक्षा दलाच्या एका मोठ्या तुकडीसोबत बुलेटप्रूफ वाहने घेऊन सीमेवरील अशांत भागात गेले आहेत.
सीमाप्रश्नावरुन मिजोराम सरकारच्या विरोधावर प्रतिक्रिया देत इंडियन ऑयल कॉर्पोरेशनने ममिती जिल्ह्यातील पर्यायी रस्त्यांवरुन मिझोरामला परीवहन इंधन पूरवठा सुरु केला आहे. ज्याणेकरुन कछार-कोलसिब मार्गावर सुरु असलेल्या संघर्षापासून बचाव होईल. मिझोराम सरकारने शेजारी राज्य त्रिपूरा आणि मणीपूर येथील काही इतर आवाश्यक साहित्य खरेदी करण्याबाबतही पावले उचलली आहेत. मिजोराम मणिपूर सोबत 95 किलोमीटर आणि त्रिपूरा सोबत 109 किलोमीटर सीमा सामायिक करते. (हेही वाचा, Assam-Mizoram Border Dispute: CM हिमंत बिस्वा सरमा यांच्या विरोधात FIR; मिझोराम सरकारच्या अधिकाऱ्यांची कारवाई)
राजकीय भूमिकांवरुन असम विधानसभेचे अध्यक्ष बिस्वजीत दैमारी यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय 10 सदस्यीय समितीने सीमाभागाचा दौरा केला आहे. तसेच, या समितीने मिझोरामकडून करण्यात आलेल्या गोळीबाराचा तीव्र विरोध केला. मिझोरमकडून करण्यात आलेल्या गोळीबारात 6 पोलीस अधिकारी मारले गेले होते.
असम विधानसभेचे अध्यक्ष बिस्वजीत दैमारी यांनी म्हटले की, ज्या पद्धीतीने मिझोराम राज्यातील सर्व पक्ष मिझोरामच्या रक्षणासाठी एकजूट झाले आहे तशाच पद्धतीने आपल्या राज्यानेही एक झाले पाहिजे. राज्याच्या हितासाठी नवा कायदा करावा लागला तरही तो आपण करण्यास मागेपुढे पाहता कामा नये.
मिझोराम पोलिसांनी (Mizoram Police) असम राज्याचे मख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांच्या विरोधात एफआयआर (FIR) दाखल केला आहे. या प्रकरणात हिमंत बिस्वा सरमा सरकारच्या प्रशासनातील सहा प्रमुख अधिकाऱ्यांशिवाय सुमारे 200 अज्ञात पोलिस अधिकाऱ्यांवरही अशाच प्रकारची कारवाई केली आहे. ज्या पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल आहे त्यात एक पोलीस महानिरीक्षक (IG), एक पोलीस उप महानिरीक्षक (DIG) और एक पोलिस अधीक्षक (SP) दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. याशिवाय कछार जिल्हा उपायुक्तांचेही या गुन्ह्यात नाव आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)