Assam Floods: असम मधील पुरामुळे 25 जिल्ह्यातील 26,69,900 नागरिकांना फटका तर 89 जणांचा बळी
तसेच आतापर्यंत पुरामुळे 89 जणांचा बळी गेल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. सरकारकडून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी 280 रिलिफ कॅम्पची उभारणी सुद्धा करण्यात आली आहे.
असम मध्ये निर्माण झालेल्या पुरपरस्थितीचा फटका संपूर्ण राज्याला बसला आहे. राज्यातील विविध ठिकाणी पुराची परिस्थिती निर्माण झाली असून नागरिकांसह जनावरांचे सुद्धा हाल झाले आहेत. याच दरम्यान आता असम मधील पुरामुळे 25 जिल्ह्यातील तब्बल 26,69,900 लोकांना याचा फटका बसला आहे. तसेच आतापर्यंत पुरामुळे 89 जणांचा बळी गेल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. सरकारकडून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी 280 रिलिफ कॅम्पची उभारणी सुद्धा करण्यात आली आहे.
तसेच मुसळधार पावसामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. या ठिकाणच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे ही काम सुरु आहे. त्याचसोबत डिब्रुगढ मधील रंगा मोला आणि मिरी गावात सुद्धा पुराचे पाणी शिरल्याने जवळजवळ 95 परिवार शेल्टर होममध्ये राहत आहेत.(Assam Floods: असम मधील काजीरंगा नॅशनल पार्क, बोकाहाट टायगर रिझर्व्हच्या काही भागात पुर परिस्थिती निर्माण झाल्याने 68 जनावरांचा बळी)
रिपोर्ट्सनुसार, ब्रम्हपुत्रा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने अन्य नद्यांच्या पातळीत ही वाढ झाली आहे. राज्यातील बहुतांश भागात नद्यांच्या पाण्याच्या पातळीने 1,15,515.25 हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. अधिकाऱ्यांनी असे ही म्हटले आहे की, काजीरंगा राष्ट्रीय उद्यानात सुद्धा पुराचे पाणी घुसल्याने जवळजवळ 120 जनावरांचा बळी गेला आहे. तसेच 147 जनावरांना वाचवण्यात यश आले आहे.