Arun Jaitley Funeral Live Update: अरुण जेटली पंचत्वात विलीन, शासकीय इतमामात दिला निरोप

रुण जेटली यांचे पार्थिव दिल्ली येथील त्यांच्या निवास्थानातून आज सकाळी 10 वाजता भाजपा कार्यालयात आणण्यात येणार आहे. तर संध्याकाळी 4 वाजता निगमबोध घाट परिसरात शासकीय इतमामात जेटलींवर अंत्यसंस्कार होतील.

25 Aug, 20:47 (IST)

माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांना भाजपा नेते आणि कुटुंबियांच्या समवेत शोकाकुल वातावरणात आज अंतिम निरोप देण्यात आला. दिल्ली येथे निगमबोध घाटात त्यांना शाहसकीय इतमामात काही वेळापूर्वी अखेरची मानवंदना देण्यात आली होती, यानंतर जेटलींच्या पार्थिवाला मुलगा रोहन याच्या हस्ते मुखाग्नी दिला गेला. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद व उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू देखील उपस्थित होते.

 

9  ऑगस्ट रोजी जेटली यांची तब्येत अधिक खालावल्याने त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जिथे त्यांनी सलग दोन आठवडे मृत्यूशी लढा दिला. मात्र काल, म्हणजेच 24 ऑगस्ट ला अखेरीस त्यांची प्राणज्योत मालवली. जेटली हे भाजपा पक्ष व पंतप्रधान नरेंद्र मोदींचे संकटमोचक होते त्यामुळे निश्चितच त्यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळात पोकळी निर्माण झाली आहे. 

25 Aug, 19:55 (IST)

अरुण जेटली यांच्या पार्थिवाला शासकीय इतमामात अंतिम सलामी देण्यास सुरुवात झाली आहे. नुकतीच लष्करकडून त्यांना मानवंदना देण्यात आली. काहीच वेळात त्यांच्या पार्थिवावर अंतिम विधीला सुरुवात होणार आहे. जेटलींना शेवटचा निरोप देण्यासाठी अनेक राजकीय मंडळींसह निगाम बोध घाट परिसरात गर्दी झाली आहे, त्यामुळे सुरक्षा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. 

 

25 Aug, 19:45 (IST)

अरुण जेटली यांचे पार्थिव दिल्ली येथील BJP मुख्यालयातून निघाम बोध घाटामध्ये नुकतेच दाखल झाले आहे.  याठिकाणी जेटली यांच्या पार्थिवावर 2.30  वाजताच्या सुमारास अंत्यसंस्कार होतील.दरम्यान, जेटलींचे अंतिम दर्शन घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपा खासदार व माजी क्रिकेटर गौतम गंभीर सुद्धा निगम बोध येथे दाखल झाले आहेत.

25 Aug, 18:45 (IST)

अरुण जेटली यांचे पार्थिव दिल्ली येथील BJP मुख्यालयातून  निगम बोध घाटाकडे नेण्यासाठी रवाना करण्यात आले आहे. याठिकाणी जेटली यांच्या पार्थिवावर 2. 30 वाजताच्या सुमारास अंत्यसंस्कार होतील.

 

25 Aug, 18:18 (IST)

दिल्ली येथील BJP मुख्यालयात केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन, रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी अरुण जेटली यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले.डॉ. हर्षवर्धन हे जेटलींना रुग्णलायत दाखल केल्यापासूनच त्यांच्या सोबत होते. यावेळी झारखंडचे मुख्यमंत्री राघूबार दास देखील उपस्थित होते.

25 Aug, 18:02 (IST)

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नुकतेच दिल्ली येथील BJP मुख्यालयात अरुण जेटली यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विदेश दौऱ्यामुळे आज उपस्थित नसताना राजनाथ यांनी त्यांच्या वतीने सुद्धा जेटली यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

25 Aug, 17:54 (IST)

अरुण जेटली यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी योग गुरु रामदेव बाबा याबानी देखील दिल्लीतील BJP मुख्यालयात हजेरी लावली. यावेळी त्यांनी जेटलींना श्रद्धांजली वाहिल्यावर शोक व्यक्त केला. केवळ राष्ट्रीय नाही तर जागतिक स्तरावर नेतृत्व करण्याची क्षमता जेटली यांच्यात होती. एक महिन्याआधी मी त्यांची भेट घेतली असता त्यांना तेव्हाही उत्साही पाहिले होते,त्यामुळे त्यांच्या निधनाची वार्ता अद्यापही अविश्वसनीय आहे असेही रामदेव बाबा म्हणाले. 

25 Aug, 16:43 (IST)

अरुण जेटली यांचे पार्थिव काही वेळापूर्वी  त्यांच्या राहत्या घरून दिल्ली येथील भाजपा मुख्यालयात आणण्यात आले आहे. यावेळी गृहमंत्री अमित शहा सह भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी जेटलींचे अंत्यदर्शन घेऊन त्यांना श्रध्दांजली वाहिली .

25 Aug, 16:33 (IST)

अरुण जेटली यांचे पार्थिव त्यांच्या राहत्या घरून दिल्ली येथील भाजपा मुख्यलायत आणण्यात आले आहे. यावेळी गृहमंत्री अमित शहा भाजपचे राज्यवर्धन राठोड बी.एल. संतोष, विजय गोयल, शिवराज चौहान, राम माधव यांच्यासह अनेक नेतेमंडळी जेटली यांच्या कुटुंबासह उपस्थित आहेत.

25 Aug, 15:40 (IST)

भारतातील ब्रिटेनचे उच्च आयुक्त सर डॉमिनिक अॅस्क्विथ यांनी काही वेळापूर्वी अरुण जेटली यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांनी जेटली हे भारताचं नव्हे तर ब्रिटनच्या जनतेसाठी सुद्धा मौल्यवान होते असे म्हंटले आहे. जेटलींना ओळखताना, सोबत काम करताना त्यांच्या कर्तबगारीचा, विनोदी शैलीचा आणि चांगुलपणाचा नेहमीच अनुभव आला आणि यापुढेही ते कायम आठवणीत राहतील असे डॉमिनिक म्हणाले.

25 Aug, 15:17 (IST)

अरुण जेटली यांचे पार्थिव त्यांच्या राहत्या घरून दिल्ली येथील भाजपा मुख्यालयात नेण्यासाठी रवाना झाले आहे. जेटलींच्या पार्थिवावर दुपारी निघमबोध घाटावर अंत्यसंस्कार होण्याआधी काही काळ भाजपा मुख्य कार्यालयात ठेवण्यात येईल.

25 Aug, 15:06 (IST)

अरुण जेटली यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल  हे काही वेळापूर्वी दिल्ली येथील जेटलींच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. याशिवाय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोतीलाल वोहरा, आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, आरएलडी नेते अजित सिंह यांनी देखील जेटली यांना श्रद्धांजली वाहिली.

ANI ट्विट 


नवी दिल्ली, 25th ऑगस्ट : भारतीय जनता पक्षाचे (BJP)  ज्येष्ठ आणि अभ्यासू नेते माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली (Arun Jaitley) यांचे प्रदीर्घ आजारानंतर काल म्हणजेच 24 ऑगस्ट रोजी एम्स (AIIMS) रुग्णालयात निधन झाले. वयाच्या 66 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला ज्यानंतर, राजकीय वर्तुळापासून ते सामान्य नागरिकांपर्यंत सर्वत्र शोककळा पसरली आहे. दरम्यान, अरुण जेटली यांचे पार्थिव दिल्ली येथील त्यांच्या निवास्थानातून आज सकाळी 10 वाजता भाजपा कार्यालयात आणण्यात येणार आहे. तर संध्याकाळी 2.30 वाजता निगम बोध घाट (Nigambodh Ghat) परिसरात शासकीय इतमामात जेटलींवर अंत्यसंस्कार होतील.

कालपासूनच जेटली यांच्या घरी नेते मंडळींची वर्दळ आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू ,काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह आणि सोनिया गांधी यांनी सुद्धा जेटली यांच्या राहत्या घरी त्यांच्या परिवाराची भेट घेतली.अमित शहा, सुरेश प्रभू सह भाजप, कॉंग्रेस नेत्यांकडून अरूण जेटली यांना श्रद्धांजली

(Arun Jaitley यांनी केंद्रीय अर्थमंत्री पदी घेतले होते हे '6' मुख्य निर्णय)

अरुण जेटली यांची प्रकृती कित्येक महिन्यापासून खालावली होती. कॅन्सर, किडनी प्रत्यारोपण, श्वसनाचा त्रास, व अन्य अनेक व्याधींमुळे आलेला अशक्तपणा यामुळे 9 ऑगस्टला त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतरही कित्येकदा त्यांचे प्रकृती स्थिरावत होती मात्र काल दुपारी 12 वाजून 7 मिनिटांनी अखेरीस त्यांची प्राणज्योत मालवली. यानंतर भाजपा सह विरोधी पक्षाच्या अनेक नेत्यांनी त्यांना ट्विटरच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या विदेश दौऱ्यावर असताना जेटली यांच्या कुटुंबीयांनी त्यांना दौरा रद्द न करण्याचे आवाहन केले आहे तर त्यांच्या वतीने गृह मंत्री अमित शहा आणि आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी काल जेटली यांना श्रद्धांजली वाहिली. अरुण जेटली यांचे व्यक्तिगत जीवन, शिक्षण आणि राजकीय कारकीर्द

दरम्यान, आज मोदी हे बहारीन मधील श्रीनाथजी  मंदिराला भेट देणार आहेत, तत्पूर्वी त्यांनी काल बहरीन मधील भारतीयांशी संवाद साधताना" मी इतक्या दूर असताना माझा एक साथी हरपला "असे म्हणत जेटली यांच्या निधनाचा शोक व्यक्त केला. काही दिवसांपूर्वी माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे सुद्धा निधन झाले होते त्यापाठोपाठ जेटली यांचे जाणे म्हणजे भाजपा साठी मोठा भावनिक धक्का असल्याचे सुद्धा म्हंटले जात आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now