मोदी सरकारने कलम 370 हटवल्याने कश्मीरी तरुणींना होणार फायदा, लागू होणार 'हे' कायदे

गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी जम्मू कश्मीर विभाजन विधेयक राज्यसभेत मांडले.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

मोदी सरकारने आज कलम 370 जम्मू-कश्मीर (Jammu-Kashmir) मधून काढून टाकला आहे. गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी जम्मू कश्मीर विभाजन विधेयक राज्यसभेत मांडले. या निर्णयानंतर जम्मू-कश्मीरला देण्यात आलेला विशेष राज्याचा दर्जा काढून टाकण्यात आला आहे.

दुसऱ्या बाजूला सोशल मीडियात कश्मीरी महिला आणि तरुणींच्या अधिकारांबाबत जोरदार चर्चा रंगत आहे. जाणून घ्या कलम 370 पूर्वी आणि नंतर कश्मीरी तरुणींची स्थिती बदलणार आहे. त्याचसोबत तरुणींना या निर्णयामुळे फायदा होणार आहे.

-शरीयतचा कायदा लागू होणार नाही

आता पर्यंत जम्मू-कश्मीरी महिला फक्त शरीयत कायद्यामध्ये येत होत्या. शादीपूर्वी ते तलाक पर्यंतच्या सर्व घटना भारतीय संविधानअंतर्गत सोडवले जाण्याऐवजी शरीयतच्या माध्यमातून सोडवले जात होते. मात्र कलम 370 हटवल्यानंतर आता त्यांना सामान्य भारतीय महिलांसारखे कायद्याअंतर्गच अधिकार मिळणार आहेत.

-भारतीय तरुणासोबत लग्न केले तरीही कोणताही अडथळा येणार नाही

जम्मू-कश्मीर मधील एखाद्या महिलेने कश्मीरशिवाय कोणत्याही अन्य देशातील तरुणासोबत लग्न केल्यास त्यांची नागरिकत्व संपुष्टात येत होते. परंतु कलम 370 हटवल्यानंतर हा नियम पूर्णपणे बरखास्त झाला आहे. त्यामुळे आता महिलांना पुरुषांप्रमाणे समान हक्क मिळणार आहेत. तसेच राज्याचे नागरिकत्व सुद्धा कायम राहणार आहे.

-पाकिस्तानी नागरिकांना मिळणार नाही नागरिकत्व

आतापर्यंत जम्मू-कश्मीर मधील महिलेने पाकिस्तानी नागरिकासोबत लग्न केल्यास त्याला सुद्धा कश्मीरचे नागरिकत्व मिळत होते. यामुळे पाकिस्तानी लोकांना कश्मीरचे नागरिकत्व मिळवणे सहज सोपे होते. मा्त्र 370 कलम काढून टाकल्यावर पाकिस्तान नागरिकाला कोणत्याही परिस्थितीत भारतीय नागरिकत्व मिळणार नाही आहे.(जम्मू-कश्मीर आणि लद्दाख यांच्या रुपात देशाला मिळाले 2 नवे केंद्रशासित प्रदेश, येथे वाचा भारतीय राज्यासह UTs ची पूर्ण माहिती)

आतापर्यंत जम्मू-कश्मीरचा झेंडा वेगळा होता. त्याचसोबत नागरिकांना दुहेरी नागरिकत्व मिळाले होते. कलम 370 हटवल्यानंतर आता भारताचा झेंडा किंवा राष्ट्रीय प्रतीकांचा अपमान केल्यास तो अपराध ठरणार आहे.