Laxmi Ratan Shukla Resigns From TMC Govt: ममता बॅनर्जी यांना आणखी एक धक्का, माजी क्रिकेटपट-मंत्री लक्ष्मी रतन शुक्ला यांनी दिला राजीनामा

पश्चिम बंगाल विधानसभा 2021 च्या निवडणूकीपूर्वी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना एकामागून एक झटके बसत आहे. पहिल्या शुवेंदू अधिकारीने तृणमूल कॉंग्रेसच्या (टीएमसी) सर्व पदांचा राजीनामा दिला तर आता माजी क्रिकेटपटू व क्रीडामंत्री लक्ष्मी रतन शुक्ला यांनी सरकारमधून आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मंत्रीपदासह शुक्ला यांनी हावडा जिल्हाध्यक्षपद देखील सोडले आहे.

लक्ष्मी रतन शुक्ला टीएमसी (Photo Credit: Facebook)

Laxmi Ratan Shukla Resigns: पश्चिम बंगाल विधानसभा 2021 च्या निवडणूकीपूर्वी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना एकामागून एक झटके बसत आहे. पहिल्या शुवेंदू अधिकारीने तृणमूल कॉंग्रेसच्या (Trinamool Congress) सर्व पदांचा राजीनामा दिला तर आता माजी क्रिकेटपटू व क्रीडामंत्री लक्ष्मी रतन शुक्ला (Laxmi Ratan Shukla)

यांनी सरकारमधून आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मंत्रीपदासह शुक्ला यांनी हावडा जिल्हाध्यक्षपद देखील सोडले आहे. राजीनामा दिल्यानंतरही ते सध्या तृणमूल कॉंग्रेसचे आमदार आहेत. लक्ष्मी रतन शुक्ला राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी टीम इंडियाकडून (Team India) तीन एकदिवसीय सामने खेळले आहेत. आयपीएलमध्ये ते कोलकाता नाईट रायडर्स, दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघाचे सदस्य होते. गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शुक्ला यांनी टीएमसीमध्ये प्रवेश करत राजकीय खेळी सुरू केली. बंगालच्या उत्तरेकडील हावडा येथून ते आमदार म्हणून निवडून आले, ज्यानांतर ममता सरकारमध्ये त्यांना क्रीडा व युवा व्यवहार मंत्रीपद देण्यात आले.

दरम्यान, बंगालमध्ये एप्रिल-मे महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत शुक्ला यांचा राजीनामा टीएमसीसाठी मोठा धक्का मानले जात आहे. यापूर्वी शुभेंदू अधिकारी यांनी ममता सरकारमध्ये मंत्रीपदाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. याशिवाय टीएमसीचे अनेक आमदार व समर्थकांनी पक्ष सोडला आहे. लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंतच्या सर्वोत्कृष्ट कामगिरीनंतर भाजपाचा आत्मविश्वास मजबूत झाला आहे. निवडणुकीत भाजपने 18 जागांवर ऐतिहासिक विजय नोंदविला होता. भाजपच्या बंगालमधील या विजयानंतर आता एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे की 2021 मध्ये भाजपा बंगालमध्ये आपले सरकार स्थापन करू शकेल?

1997-98 च्या हंगामात शुक्लाने रणजी करंडक स्पर्धेत शानदार प्रदर्शन केले आणि आणि दक्षिण आफ्रिकेतील एमटीएन युवा अंडर-19विश्वचषकात संघासाठी केलेल्या चांगल्या कामगिरीनंतर ते चर्चेत आले. विल्स ट्रॉफी स्पर्धेत तो बंगाल संघाचा एक भाग होता, ज्यात संघाने सेमीफायनल फेरी गाठली. शुक्ला 30 डिसेंबर 2015 रोजी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त झाले.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now