अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याने गर्भवती झाली, सरकारी कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

त्यानंतर ही पीडित मुलगी गर्भवती झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Latestly/Illustration)

आंध्र प्रदेशात कृष्णा जिल्ह्यात एका 30 वर्षीय व्यक्तीने एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर ही पीडित मुलगी गर्भवती झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणी आरोपी हा सरकारी कर्मचारी असल्याचे समोर आले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, गुरुवारी एका सरकारी रुग्णालयात पीडित मुलगी वैद्यकिय उपचाराठी आली तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले आहे. तसेच डॉक्टरांनी पीडित मुलगी गर्भवती असल्याचे तपासणीनंतर घरातील मंडळींना स्पष्ट सांगितले. वैद्यकिय तपासणीअंतर्गत या प्रकरणी अधिक तपास केला जात आहे.

पीडित मुलीच्या आईने पोलिसांना असे सांगितले की, मुलगी आणि तिची आत्या आरोपीच्या घरीकाम करतात. काही दिवसांपूर्वी आरोपीने तिच्या मुलीला रात्री घरी काम करण्यासाठी बोलावून तिचे लैंगिक शोषण केले. तर पोलिसांकडून या प्रकरणी तपासणी केली जात आहे. परंतु पीडित मुलगी ही गेल्या तीन महिन्यांपासून गर्भवती असल्याचे सांगितले जात आहे.