Andhra Pradesh: तरुणाच्या छेडछाडीला कंटाळून मुलीने केले किटकनाशक प्राशन; उपचारादरम्यान मृत्यू
किटकनाशकाचे सेवन करुन या मुलीने आपले जीवन संपवण्याचा प्रयत्न केला.
तरुणाच्या छेडछाडीला कंटाळून आंध्रप्रदेश (Andhra Pradesh) मधील एका मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. किटकनाशकाचे सेवन करुन या मुलीने आपले जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान तिचा शनिवारी (19 डिसेंबर) संध्याकाळी तिचा मृत्यू झाला. तरुणीची छेडछाड करणाऱ्या तरुणाचे नाव वरा प्रसाद असे आहे. ही घटना गुंटूर (Guntur) मधील मेडीकोंडुरू मंडळातील (Medikonduru Mandal) कोरापडु (Korrapadu) गावात झाली.
आयुष्य संपवण्यासाठी तरुणीने किटकनाशकांचे सेवन केले. मात्र तिच्या कुटुंबियांनी तिला त्वरीत हॉस्पिटलमध्ये नेले. परंतु, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तरुणाकडून होत असलेल्या छेडछाडीमुळे होणारा त्रास तरुणीने एका व्हिडिओमध्ये कैद केला आहे. प्रसादच्या त्रासाला कंटाळून आपण आपले आयुष्य संपवत आहोत. कायद्याने त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी, असे तिने व्हिडिओमध्ये म्हटले आहे. (Pandharpur Suicide: छेडछाडीला कंटाळून एका अल्पवयीन मुलीची आत्महत्या; पंढरपूर येथील धक्कादायक घटना)
हा व्हिडिओ पाहून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी पुढील तपास सुरु केला आहे. आरोपीला शोधून काढण्यासाठी ग्रामिण गुटूंर एसपी यांनी स्पेशल पोस्टचे नियोजन केले आहे. यादरम्यान, तडीकोंडा YSRCP आमदार उंडावल्ली श्रीदेवी यांनी पीडित मुलीच्या कुटुंबियांना भेट दिली आणि दोषींविरुद्ध योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. (बीड: छेडछाडीला कंटाळून दहावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या)
महिलांवरील शारीरिक, मानसिक आणि लैगिंक अत्याचाराच्या अनेक घटना देशभरातून समोर येत असतात. या घटनांनी महिला सुरक्षेचा प्रश्न वारंवार अधोरेखित होत असतो. यापूर्वी देखील अनेक मुलींनी छेडछाडीला कंटाळूना आपले जीवन संपवले आहे.