Indian Army Cheetah Helicopter: भारतीय लष्कराचे चित्ता हेलिकॉप्टर कोसळले
हेलिकॉप्टर क्रूच्या बचावासाठी सुरक्षा दलांचे शोध पथक बर्फाच्छादित भागात पोहोचत आहेत. अधिक तपशीलांची प्रतीक्षा आहे: संरक्षण अधिकारी
भारतीय लष्कराचे (Indian Army) चीत्ता हेलिकॉप्टर अपघातग्रस्त (Cheetah Helicopter Crashe) झाले आहे. हेलीकॉप्टरचा पायलट सुरक्षीत आहे. जम्मू कश्मीर येथील गुरेज सेक्टर येथील बरौन परिसरात ही दुर्घटना घडली. परिसरात मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी झाल्याने ही दुर्घटना घडल्याचे समजते. भूमार्गावरुन आणि हवाई मार्गे हेलीकॉप्टर (Cheetah Helicopter) कोसळलेल्या ठिकाणी मदत आणि बचाव कार्यासाठी पोहोचण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
लष्करातील अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमधील गुरेझ सेक्टरमधील बरूम भागात भारतीय लष्कराचे चित्ता हेलिकॉप्टर कोसळले आहे. हेलिकॉप्टर क्रूच्या बचावासाठी सुरक्षा दलांचे शोध पथक बर्फाच्छादित भागात पोहोचत आहेत. अधिक तपशीलांची प्रतीक्षा आहे.
दरम्यान, या आधीही अनेक वेळा हेलिकॉप्टर आणि विमान कोसळण्याचे दुर्घटना झाली आहे. अशा अपघातांमध्ये जीवीतहानीही मोठ्या प्रमाणावर होते.