Mizoram Earthquake: मिझोरम भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले; 5 रिश्टर स्केल तीव्रता, चंपाईपासून 98 किलोमीटर पूर्वेला होते केंद्र
काही दिवसांपूर्वी गुजरातमध्येही भूकंपाचे धक्के बसले होते व आता गुरुवारी ईशान्येकडील मिझोरम (Mizoram) राज्यात भूकंपाचे धक्के जाणवले.
कोरोना व्हायरस लॉक डाऊनच्या काळात राजधानी दिल्ली अनेकवेळा भूकंपाच्या धक्क्यांनी (Earthquake) हादरली होती. काही दिवसांपूर्वी गुजरातमध्येही भूकंपाचे धक्के बसले होते व आता गुरुवारी ईशान्येकडील मिझोरम (Mizoram) राज्यात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 5 मोजली गेली आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या अहवालानुसार सायंकाळी 7 वाजून 29 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे केंद्रबिंदू चंपाई (Champhai) पासून 98 किलोमीटर पूर्वेला होते. अशाप्रकारे तीव्रतेने येणार्या भूकंपांच्या वारंवार धक्क्यांमुळे तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे, कारण एखादा मोठा भूकंप मोठ्या प्रमाणावर विनाश घडवू शकतो.
पहा एएनआय -
या भूकंपामुळे कोणत्याही नुकसानीची माहिती अजूनतरी मिळाली नाही. गेल्या रविवारी गुजरातमध्ये राजकोट-भचाऊ क्षेत्रात भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 5.8 मोजली गेली होती. हा भूकंप इतका तीव्र होता की, यामुळे लोक घाबरुन घराबाहेर आले होते.
(हेही वाचा: दिल्ली-एनसीआर परिसरात दीड महिन्यात 11 वेळा भूकंप, मोठ्या आपत्तीचे संकेत; बुधवारीही पुन्हा बसले धक्के)
दरम्यान, राजधानी दिल्ली-एनसीआर (Delhi-NCR) परिसरात गेल्या दीड महिन्यात तब्बल 11 वेळा भूकंपाचे धक्के बसले. राजधानी दिल्ली बुधवारी (3 जून 2020) भूकंपाच्या सौम्य धक्क्यांनी हादरली. या भूकंपाचा केंद्रबिंदू नोएडा येथे नोंदवला गेला. राजधानी दिल्लीत सातत्याने भूकंप (Earthquake) होणे हे धोक्याचे संकेत आहेत. सांगितले जात आहे की, दिल्ली-एनसीआर येथे पृथ्वीच्या पोटात प्लेटो कार्यरत झल्याने उर्जा बाहेर पडत आहे. ज्यामुळे भूकंपाचे धक्के जाणवतात.