अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत दौरा, ताज महालच्या येथे जाण्यासाठी आगरा मध्ये जोरदार तयारी
तर डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतातील पहिला दिवशीचा दौरा गुजरात मधील अहमदाबाद येथे असणार आहे.
अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) येत्या 24-25 फेब्रुवारीला भारत दौऱ्यावर येणार आहे. तर डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतातील पहिला दिवशीचा दौरा गुजरात मधील अहमदाबाद येथे असणार आहे. त्यासाठी कोट्यावधींचा खर्च करण्यात आला आहे. तसेच ट्रम्प जगातील सात आश्चर्यांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ताज महालला सुद्धा भेट देणार आहेत. यावेळी डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प यांच्यासोबत भारत दौऱ्यावर येणार आहेत. ट्रम्प यांच्या स्वागतासाठी जोरदार तयारी करण्यात येत असून रस्ते सुद्धा सुधरवण्यात येत आहेत.
आगरा शहरातील मॅजिस्ट्रेट अरुण कुमार यांनी डोनाल्ड ट्रम्प 24 फेब्रुवारीला आगरा येथे येणार असल्याचे म्हटले आहे. तर संध्याकाळी 4.30 वाजता येणार असून ताज महालाला भेट देणार आहेत. तसेच ट्रम्प यांची पत्नी मेलानिया सुद्धा त्यांच्यासोबत असणार आहे. या दरम्यान आगरा मधील खेरिया विमानतळ ते ताज महाल पर्यंत रस्त्यांची रंगरंगोटी करण्यात येणार आहे.(डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागत कार्यक्रमाचे नाव आता 'केम छो' नाही, 'नमस्ते प्रेसिडेंट ट्रम्प' होणार; सरकारची घोषणा)
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी 24 फेब्रुवारीला डोनाल्ड ट्रम्प अहमदाबाद येथे जाणार असल्याचे म्हटले आहे. ट्रम्प आल्यावर त्यांचे मोठ्या थाटात स्वागत केले जाणार आहे.
डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबाद विमानतळावरून रोड शो करणार आहेत. त्यानंतर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहण्यासाठी साबरमती आश्रमातही भेट देणार आहेत. ट्रम्प हे नव्याने बांधलेल्या अहमदाबाद सरदार पटेल स्टेडियमचे उद्घाटन करणार आहेत. या स्टेडियममध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या स्वागतासाठी 'काम छो, ट्रम्प' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यूएस फर्स्ट लेडी (यूएस फर्स्ट लेडी) मेलानिया ट्रम्प यांनी आगामी भारत दौऱ्यासाठी उत्सुक असल्याचे म्हटले आहे.