ट्र्क ड्रायव्हर्स च्या हितार्थ Transport Minister Nitin Gadkari यांनी घेतला मोठा निर्णय; 2025 पासून AC Cabins बंधनकारक

त्यामुळे आता नवा नियम ट्रक ड्रायव्हर्स साठी मोठा दिलासा घेऊन येणारा आहे.

Truck | Pixabay.com

भारतामध्ये सर्वाधिक काम करणार्‍यांमध्ये ट्रक ड्रायव्हर्सचा (Truck Drivers) समावेश आहे. पण ते जितकं काम करत आहेत तितकी चांगली 'वर्किंग कंडिशन' त्यांना मिळत नाही. म्हणून आता त्यांच्यासाठी भारत सरकारने नवा प्रस्ताव आणला आहे. यामध्ये भारतातील सार्‍या ट्रक ड्रायव्हर्ससाठी केबिन्स ही एअर कंडिशन्ड (AC Cabins) केली जाणार आहेत. हा नवा प्रस्ताव Union Road Transport Minister Nitin Gadkari यांनी मंजूर केला आहे. हा प्रस्ताव 2025 पासून लागू केला जाणार आहे. आवश्यक अपग्रेडेशन करून घेण्यासाठी 18 महिन्यांचा कालावधी दिला जाणार आहे. जगातील अन्य ग्लोबल ब्रॅन्ड्स प्रमाणे भारतामध्ये ट्रक्स हे एसी केबिन आणि मॉर्डर्न फीचर असलेले नसतात.

भारतामध्ये अनेक ड्रायव्हर्स हे 12-14 तास काम करत असतात. जगात अनेक देशांमध्ये ड्रायव्हर्स चं आरोग्य लक्षात घेत कामाच्या वेळांवर बंधनं असतात. भारतामध्ये काही भागात ड्रायव्हर्स चक्क 43 ते 47 अंश तापमानामध्ये ड्रायव्हिंग करत असतात.

गडकरी सांगतात, " मंत्री झाल्यापासूनच मी केबीन एसी करण्याच्या मागे होतो. परंतू काहींनी यामुळे कॉस्ट वाढेल असं सांगत या कल्पनेला विरोध केला. मात्र आता मी सारे ट्रक एसी केबिनचे करण्याच्या प्रस्तावावर स्वाक्षरी केली आहे." नक्की वाचा: Ghaziabad-Aligarh Expressway: अवघ्या 100 तासांत बांधला 100 किलोमीटरचा गाझियाबाद-अलिगड एक्स्प्रेस वे; झाला विश्वविक्रम, Nitin Gadkari यांनी केले कामाचे कौतुक (See Photos) .

भारतामध्ये होणार्‍या अनेक रस्ते अपघातांमध्ये चालकाला आलेला थकवा देखील महत्त्वाची भूमिका साकारत असल्याचं पहायला मिळालं आहे. त्यामुळे आता नवा नियम ट्रक ड्रायव्हर्स साठी मोठा दिलासा घेऊन येणारा आहे. Road transport ministry कडून 2016 मध्ये हा प्रस्ताव समोर आला होता. आता अनेक गोष्टींमुळे विरोध झाला आणि सारं बारगळलं.