Ram Rahim Case Verdict: पत्रकाराच्या हत्येप्रकरणी बाबा राम रहीम सह चार आरोपी दोषी, शिक्षेची सुनावणी 17 जानेवारी रोजी होणार

या प्रकरणाची पुढील सुनावणी 17 जानेवारी दिवशी होणार आहे.

आरोपी राम रहीम ( File Photo)

Ram Chander Chhatarpati Murder Case: राम चंदर छत्रपती (Ram Chander Chhatarpati) या पत्रकाराच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी बाबा राम रहीम ( Gurmeet Ram Rahim)  यांना दोषी ठरवण्यात आलं आहे.  या प्रकरणाची पुढील सुनावणी 17 जानेवारी दिवशी होणार आहे. पंचकुला येथील सीबीआयच्या स्पेशल कोर्टामध्ये याप्रकरणी सुनावणी करण्यात आली आहे. बाबा राम रहीम सोबतच तीन अन्य आरोपींनादेखील या प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं आहे.

पंचकुलामध्ये कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. सुरक्षेच्या कारणास्तव या भागात जमावबंदीचे 144 कलम लागू करण्यात आले आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारा डेरा सच्चाचे प्रमुख गुरमीत सिंह राम रहीम चा जबाब  नोंदवण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

2002 साली पत्रकार रामचंद्र छत्रपती यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या हत्याकांडाचे प्रकरण 2003 साली सीबीआयकडे देण्यात आले. 2007 साली या प्रकरणातील चार्जशीट दाखल झाली. त्यावेळेस डेरा सच्चाचे प्रमुख गुरमीत सिंह राम रहीम यांच्यांवर हत्येचा कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला.