धक्कादायक! देशातील Air Pollution मुळे 5.2 वर्षांनी घटले भारतीयांचे आयुष्य; लखनऊ मधील वायू प्रदूषणाची स्थिती सर्वात खराब- University of Chicago
वायू प्रदूषणा (Air Pollution) मुळे भारतातील व्यक्तीचे सरासरी वय 5.2 वर्षे (डब्ल्यूएचओच्या मानकांनुसार) आणि राष्ट्रीय मानकांनुसार 2.3 वर्षे कमी होत आहे. शिकागो विद्यापीठाच्या (University of Chicago) एनर्जी पॉलिसी इन्स्टिट्यूटच्या (Energy Policy Institute) अहवालात ही बाब समोर आली आहे.
भारतातील प्रदूषणाची स्थिती भयावह बनत चालली आहे. वायू प्रदूषणा (Air Pollution) मुळे भारतातील व्यक्तीचे सरासरी वय 5.2 वर्षे (डब्ल्यूएचओच्या मानकांनुसार) आणि राष्ट्रीय मानकांनुसार 2.3 वर्षे कमी होत आहे. शिकागो विद्यापीठाच्या (University of Chicago) एनर्जी पॉलिसी इन्स्टिट्यूटच्या (Energy Policy Institute) अहवालात ही बाब समोर आली आहे. अहवालानुसार, भारतातील 1.4 अब्ज लोकसंख्येचे एक मोठा भाग अशा ठिकाणी राहतो, जिथे जागतिक आरोग्य संघटनेच्या मानदंडापेक्षा सरासरी जास्त प्रदूषण आहे. 84 टक्के लोक अशा ठिकाणी राहतात जिथे भारताने ठरवलेल्या मानकांपेक्षा प्रदूषणाची पातळी जास्त आहे. या अहवालात असेही समोर आले आहे की 1998 ते 2018 पर्यंत भारतातील प्रदूषणात 42 टक्के वाढ झाली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकांनुसार जर वायू प्रदूषण कमी केले, तर दिल्लीकरांचे वय 9.4 वर्षे वाढू शकते. डब्ल्यूएचओ मार्गदर्शक सूचनांनुसार, हवेतील सूक्ष्म कणांच्या रूपात प्रदूषक (PM) 2.5 चे प्रमाण प्रति घनमीटर 10 मायक्रॉनपेक्षा जास्त नसावे, तर पीएम 10 पातळी प्रति घनमीटर 20 मायक्रॉनपेक्षा जास्त नसावे. भारतामध्ये 2018 मध्ये पीएम 2.5 ची सरासरी पातळी प्रति क्यूबिक मीटर 63 मायक्रॉन होती. अहवालानुसार उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील लोकांचे वय सर्वाधिक कमी होत आहे. डब्ल्यूएचओच्या मानकांपेक्षा लखनऊमधील प्रदूषण 11.2 जास्त आहे. प्रदूषणाची ही पातळी कायम राहिल्यास लखनऊमधील प्रदूषणामुळे लोकांच्या वयाच्या 10.3 वर्षे कमी होतील. (हेही वाचा: प्रदूषणामुळे गंगा पठारावर राहणाऱ्या लोकांचे आयुर्मान 7 वर्षांनी घटले)
या अहवालात म्हटले आहे की, बांगलादेश, भारत, नेपाळ आणि पाकिस्तान या चार देशांमध्ये जगातील सुमारे एक चतुर्थांश लोकसंख्या असून, सर्वाधिक प्रदूषण असणार्या देशांच्या यादीत त्यांचा समावेश आहे. उत्तर भारत हा दक्षिण आशियातील सर्वात प्रदूषित भाग म्हणून उदयास येत आहे. अहवालानुसार डब्ल्यूएचओच्या मानकांनुसार प्रदूषण कमी झाल्यास बिहार आणि बंगालसारख्या राज्यांच्या लोकांचे वय सात वर्षांपेक्षा जास्त वाढू शकते आणि हरियाणामधील लोकांचे वय आठ वर्षांनी वाढू शकते.