Air India कडून 16 इंटरनॅशनल रूटस वर 15 जुलै पर्यंत विमानं सेवा तात्पुरती कमी, 3 ठिकाणची विमान रद्द; पहा यादी

वाईड बॉडी विमानांसह चालणाऱ्या उड्डाणांमध्ये तात्पुरती 15 टक्क्यांनी कपात करणार असल्याचे एअर इंडियाने जाहीर केल्यानंतर आता एका दिवसानंतर ही सविस्तर घोषणा करण्यात आली आहे.

Air India कडून 16 इंटरनॅशनल रूटस वर 15 जुलै पर्यंत विमानं सेवा तात्पुरती कमी, 3 ठिकाणची विमान रद्द; पहा यादी
Air India Flight (फोटो सौजन्य - Wikimedia Commons)

अहमदाबाद मधील एअर इंडियाच्या विमान (Air India Flight) दुर्घटनेनंतर आता विमान प्रवासाबद्दल विशेष खबरदारी घेतली जात आहे. एअर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या कंपनीकडून तात्पुरती काही विमानं कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये 21 जून ते 15 जुलै दरम्यान आंतरराष्ट्रीय मार्गावरील 16 ठिकाणी विमानांच्या फेर्‍या कमी करण्याचा निर्णय घेण्यातआला आहे  तर परदेशात 3 ठिकाणी चालवल्या जाणारी विमान सेवा तात्पुरत्या बंद करण्यात आल्या आहे.

वाईड बॉडी विमानांसह चालणाऱ्या उड्डाणांमध्ये तात्पुरती 15 टक्क्यांनी कपात करणार असल्याचे एअर इंडियाने जाहीर केल्यानंतर आता एका दिवसानंतर ही सविस्तर घोषणा करण्यात आली आहे. नक्की वाचा: Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद अपघातानंतर Air India ने फ्लाइट क्रमांक AI171 बदलून केला AI159; दुःखद स्मृतींचा त्रास टाळण्यासाठी घेतला निर्णय.  

कोणत्या ठिकाणची सेवा एअर इंडिया कडून बंद?

एअर इंडियाने 15 जुलै पर्यंत Delhi-Nairobi, Amritsar-London (Gatwick) आणि Goa (Mopa)-London (Gatwick) या ठिकाणची विमान सेवा 15 जुलै पर्यंत बंद राहणार असल्याचं म्हटलं आहे. सध्या एअर इंडिया कडून Delhi-Nairobi मार्गावर आठवड्यातून चार उड्डाणे होती तर अमृतसर-लंडन (गॅटविक) आणि गोवा (मोपा)-लंडन (गॅटविक) मार्गावर आठवड्यातून तीन उड्डाणे होती पण आता ती बंद करण्यात आली आहे. याशिवाय, उत्तर अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया आणि फार ईस्टकडील शहरांना जोडणाऱ्या 16 आंतरराष्ट्रीय मार्गांवरील उड्डाणे कमी केली आहेत.

Delhi-Toronto, Delhi-Vancouver, Delhi-San Francisco, Delhi-Chicago आणि Delhi-Washington या मार्गावरीक विमान सेवा एअर इंडियाने कमी केली आहे."मध्य पूर्वेतील हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे उद्भवणाऱ्या अतिरिक्त उड्डाण कालावधीसाठी तसेच उड्डाणपूर्व सुरक्षा तपासणी स्वेच्छेने करण्याच्या निर्णयामुळे ही कपात झाली आहे," असे एअर इंडियाने निवेदनात म्हटले आहे.

युरोपात कुठल्या सेवांवर परिणाम होण्याची शक्यता?

युरोपमध्ये कमी उड्डाण सेवा असलेल्या मार्गांमध्ये दिल्ली-लंडन हीथ्रो, बेंगळुरू-लंडन हीथ्रो, अमृतसर-बर्मिंगहॅम आणि दिल्ली-बर्मिंगहॅम, दिल्ली-पॅरिस, दिल्ली-मिलान, दिल्ली-कोपनहेगन, दिल्ली-व्हिएन्ना आणि दिल्ली-अ‍ॅमस्टरडॅम यांचा समावेश आहे.त्याचप्रमाणे, सुधारित वेळापत्रकानुसार दिल्ली-मेलबर्न, दिल्ली-सिडनी, दिल्ली-टोकियो हानेडा आणि दिल्ली-सोल (इंचिओन) या मार्गांवरील सेवा देखील कमी करण्यात आल्या आहेत.

इंटरनॅशनल उड्डाणांच्या तिकीटातही कपात

एअर इंडियाकडून विकेंडला अनेक हाय ट्राफिक मार्गावरील तिकिटांच्या दरातही सुमारे 30-70% कपात करण्यात आल्याची माहितदेण्यात आली आहे. सध्या अनेक ठिकाणी एअर इंडियांची विमानं उशिराने उडत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत असल्याने अनेक ठिकाणी स्वतःहूनच प्रवाशांकडून बुकिंग रोडवली आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jun 20, 2025 09:54 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).