Air India One: भारतामध्ये पोहोचला पंतप्रधान, राष्ट्रपती यांचा अभेद्य किल्ला; जाणून घ्या VVIP विमान 'एअर इंडिया वन'ची काय आहे खासियत (Video)
गुरुवारी हे व्हीव्हीआयपी विमान एअर इंडिया वन (VVIP Aircraft Air India One) अमेरिकेहून दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले.
पंतप्रधान (Prime Minister) आणि राष्ट्रपतींसाठी खास डिझाइन केलेले विमान बोइंग 777 (Boeing 777) भारतात दाखल झाले आहे. गुरुवारी हे व्हीव्हीआयपी विमान एअर इंडिया वन (VVIP Aircraft Air India One) अमेरिकेहून दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या एअर फोर्स वन सारख्या आश्चर्यकारक क्षमतांनी सज्ज असे हे व्हीव्हीआयपी विमान 'एअर इंडिया वन' जणू काही आकाशात उडणारा 'अभेद्य किल्ला'च आहे. भारताचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्यासाठी अशी दोन व्हीव्हीआयपी एअर इंडिया वन विमाने मागवण्यात आली होती. त्यापैकी पहिले आज भारतामध्ये आले.
या विमानाला भारतात येण्यासाठी काही काळ उशीरच झाला आहे. यापूर्वी हे विमान 25 ऑगस्ट रोजी भारतात येणार होते, परंतु तांत्रिक कारणांमुळे ते पुढे ढकलण्यात आले. हे हवाई विना रीफ्युल तब्बल 17 तास सतत उड्डाण करू शकते. विमान पूर्णपणे विकसित कमांड सेंटर म्हणून कार्य करण्यास सक्षम आहे, कारण ते प्रगत आणि सुरक्षित संप्रेषण प्रणालीसह सुसज्ज आहेत, जे हॅक किंवा टॅप न करता ऑडिओ आणि व्हिडिओ संवाद प्रदान करते. सध्या VVIP ज्या विमानामधून उड्डाण घेतात ते 10 डासांच्या नंतर रीफ्युल करावे लागते. (हेही वाचा: भारतासाठी सप्टेंबर महिना ठरला घातक; कोरोना व्हायरस संक्रमित 33% रुग्णांचा मृत्यू, एकाच महिन्यात सर्वाधिक 41% नागरिक COVID 19 पॉझिटीव्ह)
एएनआय ट्वीट -
ही दोन्ही विमाने भारतीय हवाई दलाच्या वैमानिकांकडून चालविली जातील. मात्र, या दोन्ही नवीन विमानांची देखभाल एअर इंडिया अभियांत्रिकी सेवा लिमिटेड (AIESL) करणार आहे. एकदा इंधन भरल्यावर हे विमान अमेरिका ते भारत असे अंतर कापू शकते. बोईंग-777 एका वेळी 6,800 मैलांचे अंतर कापू शकते. दोन्ही विमानांची किंमत सुमारे 8,458 कोटी सांगितली जात आहे. दरम्यान, आतापर्यंत भारताचे पंतप्रधान एअर इंडिया-वन कॉल साईन पासून बोईंग-7477 वापरत आले आहेत. बोईंग 747 पंतप्रधान, राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती जेव्हा ते अधिकृत परदेशी दौर्यावर असतात तेव्हा वापरतात.