Air India Express Plane Crash Update: केरळच्या कोझिकोड येथे झालेल्या विमान अपघातातील मृतांची संख्या 18 वर; मृतांमध्ये 2 वैमानिकांचा समावेश, Watch Video
केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान आणि मुख्यमंत्री पिनराई विजयन आज करीपूर परिसराला भेट देणार आहेत. जेथे हे विमान कोसळले होते.
केरळ राज्यासाठी कालचा (7 ऑगस्ट) दिवस हा आजवरच्या इतिहासातील काळा दिवस ठरला. एकाच दिवशी केरळ (Kerala) राज्याला हादरवून टाकणा-या दोन धक्कादायक घटना काल घडल्या. एक भूस्खलन आणि दुसरं एअर इंडियाच्या विमानाचा (Air India Express Plane) अपघात. दुबईहून 191 प्रवाशांना घेऊन आलेले एअर इंडिया एक्स्प्रेसचे विमान केरळमधील कोझिकोडच्या (Kozhikode) करीपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताना धावपट्टीवरून घसरल्याने शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. या दुर्घटनेतील मृतांची संख्या 18 वर पोहोचली असून यात 2 वैमानिकांचा समावेश आहे. तर 127 प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जळील रुगणालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, या घटनेच्या तपासाचे आदेश केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीपसिंह पुरी (Hardeep Singh Puri) यांनी दिले. एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्वेस्टिगेशन ब्यूरो (AAIB) या घटनेचा तपास करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान आणि मुख्यमंत्री पिनराई विजयन आज करीपूर (Karipur) परिसराला भेट देणार आहेत. जेथे हे विमान कोसळले होते. Air India Flight Accident: केरळच्या कोझिकोड येथे झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातामध्ये 16 मृत्यू, 123 जखमी आणि 15 गंभीर जखमी; शोध व बचावकार्य पूर्ण
ANI ट्विट:
#WATCH Latest visuals from Kozhikode International Airport in Karipur, Kerala where an #AirIndiaExpress flight crash-landed yesterday.
18 people, including two pilots, have lost their lives in the incident. pic.twitter.com/r1YRiIkbrM
— ANI (@ANI) August 8, 2020
एयर इंडियाच्या आयएक्स 1344 (IX1344) विमानाने संध्याकाळी दुबईहून उड्डाण घेतले. हे विमान करीपूर विमानतळावर उतरताना धावपट्टीवरून घसरले व दरीत कोसळले. सध्या केरळमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. सतत कोसळत असणाऱ्या पावसामुळे रनवे वर पाणी साठले होते, अशात दृश्यमानता कमी झाल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातामध्ये जखमी झालेल्या लोकांना कोझिकोड मेडिकल कॉलेज व इतर जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे.
(The above story first appeared on LatestLY on Aug 08, 2020 09:10 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

