एअर इंडियाकडून फ्रान्स, इटली, जर्मनीसह अन्य देशांची उड्डाणे 30 एप्रिल पर्यंत रद्द

यामध्ये फ्रान्स, इटली आणि जर्मनी, स्पेन, इज्राइल, दक्षिण कोरिया आणि श्रीलंका येथील विमानांची उड्डाणे रद्द केली आले आहेत. कंपनीच्या एका अधिकाऱ्यांनी असे सांगितले आहे की, कोरोना व्हायरसचा धोका पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे.

Air India | Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus)  एअर इंडिया (Air India) कंपनीने त्यांची उड्डाणे येत्या 30 एप्रिल पर्यंत रद्द केली आहेत. यामध्ये फ्रान्स, इटली आणि जर्मनी, स्पेन, इज्राइल, दक्षिण कोरिया आणि श्रीलंका येथील विमानांची उड्डाणे रद्द केली आले आहेत. कंपनीच्या एका अधिकाऱ्यांनी असे सांगितले आहे की, कोरोना व्हायरसचा धोका पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे.तसेच रोम (इटली) येथील सेवा 15 ते 25 मार्च पर्यंत बंद राहणार आहेत. तर मिलान आणि साउथ कोरियाची राजधानीसाठीची उड्डाणे 14 ते 28 मार्च पर्यंत रद्द करण्यात आली आहेत. ऐवढेच नाही तर सरकारकडून पर्यटन व्हिजा 15 एप्रिल पर्यंत रद्द करण्यात आल्यानंतर कंपनीने हा निर्णय घेतला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने असे सांगितले आहे की, केरळ येथे कोरोनाचे 17, दिल्लीत आणि राजस्थान येथे अनुक्रमे 1-1 नवी प्रकरणे समोर आली आहेत.

आरोग्य मंत्रालयाकडून असे सांगण्यात आले आहे की, विमानतळावर आतापर्यंत 10 लाखापेक्षा अधिक प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे. जागतिक स्तरावर कोरोनाचा वाढते जाळे पाहता भारताने मंगळवारी फ्रान्स, जर्मनी आणि स्पेन येथील नागरिकांना देशात येण्यास बंदी घातली आहे. तसेच त्यांच्या ई-व्हिजाला स्थगिती देण्यात आली आहे. याच दरम्यान, ओसीआय कार्ड होल्डर यांना देण्यात आलेली व्हिजा फ्री ट्रॅव्हल सुविधा सुद्धा 15 एप्रिल प्रर्यंत बंद करण्यात आली आहे.(Coronavirus In India: भारतामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 73; 56 भारतीय तर 17 परदेशी Covid-19 बाधित)

देशात आतापर्यंत 60 पेक्षा अधिक कोरोनाची प्रकरणे समोर आली आहेत. कोरोना व्हायरसमुळे सर्व उद्योगधंद्यांना फटका बसला आहे. WHO या आरोग्य संघटनेदेखील कोरोनाची वाढती भीती पाहता त्याला जागतिक आरोग्य म्हणून घोषीत केले आहे. दरम्यान त्यानंतर भारताने 15 एप्रिल पर्यंत परदेशातून येणार्‍या पर्यटकांचा व्हिसा रद्द केला आहे. तर अमेरिकेमध्येही 30 मार्चपर्यंत युरोपातून येणार्‍या प्रवाशांना बंदी घालण्यात आली आहे.