Cardiac Arrest: वृत्तपत्र वाचत असताना AIADMK आमदाराचा मृत्यू

AIADMK MLA R Kanagaraj | (Photo Credits: ANI)

तामिळनाडू (Tamil Nadu ) राज्यातील ऑल इंडिया अन्ना द्रमुक मुनेत्र कळघम (AIADMK) पक्षाचे आमदार आर कानगाराज (R Kanagaraj) यांचे वृत्तपत्र वाचताना गुरुवारी सकाळी निधन झाले. ते 64 वर्षांचे होते. वृत्तपत्र वाचत असताना आर कानगाराज यांना कार्डिअॅक अरेस्ट (Cardiac Arrest) आला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सकाळी 7.40 वाजता घडली.

आर कानगाराज यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी आहेत. पक्षाच्या सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे की, कोयंबटूर जिल्ह्यातील सुलूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार कानगाराज हे मृत्यूसमयी वृत्तपत्र वाचन करत होते. दैनंदिन वृत्तपत्र वाचनाची त्यांना पहिल्यापासूनच सवय होती. त्यामुळे गुरुवारी सकाळीही ते वृत्तपत्र वाचत होते. दरम्यान, त्यांना कार्डिअॅक अरेस्ट आला. कानगाराज यांच्या शेजारी असलेल्या एका डॉक्टरने त्यांना वाचविण्याचे प्रयत्न केले. परंतु, हे प्रयत्न यशस्वी होऊ शकले नाहीत. (हेही वाचा, मैदानावर क्रिकेट खेळत असताना, हृदयविकाराच्या झटक्याने क्रिकेटपटूचा मृत्यू)

सुलतानपेट येथील निवासस्थानी कानगाराज यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. त्यांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी लोकांची मोठी गर्दी झाली आहे. कानगाराज हे गेली 35 वर्षे एआयडिएमके पक्षात होते. ते पहिल्यांदाच आमदार बनले होते. कानगाराज यांच्या रुपात राज्यातील विधानसभेच्या रिक्त असलेल्या जागांची संख्या 22 झाली आहे. निवडणूक आयोगाने राज्यातील 18 जागांवर पोटनिवडणूक जाहीर केली आहे. त्यासाठी लोकसभा निवडणुकीसोबत येत्या 18 तारखेला मतदान केले जाणार आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif