अहमदाबाद: सुरत मधील व्यापाऱ्याने 2 महिन्यांच्या मुलीसाठी चंद्रावर खरेदी केली जमीन
विजय हे काचेचे व्यापारी असून मूळ रुपात सौराष्ट्र येथील आहेत.
सुरत (Surat) मधील सरथाणा परिसरात राहणाऱ्या विजय कथेरिया यांनी आपल्या दोन महिन्यांची मुलगी नित्या हिला भेट म्हणून चंद्रावर जमीन खरेदी केली आहे. विजय हे काचेचे व्यापारी असून मूळ रुपात सौराष्ट्र येथील आहेत. सध्या कथेरिया सुरत मधील सरथाणा परिसरात राहतात. त्यांनी चंद्रावर जमीन खरेदीसाठी न्यूयॉर्क इंटरनॅशनल लूनार लँड रजिस्ट्री कंपनीला मेल पाठवला होता. कंपनीकडून कथेरिया यांचा अर्ज स्विकारला गेला.(उल्हासनगर मधील बांधकाम व्यावसायिक राम वाधवान यांची चंद्रावर जमीन खरेदी)
विजय कथेरिया यांच्या घरी दोन महिन्यांपूर्वी नित्या हिचा जन्म झाला. मुलीचा जन्म झाल्यानंतर कथेरिया यांनी मुलीला खास गिफ्ट देण्याचे ठरविले. तेव्हाच कथेरिया यांनी मुलीला दिले जाणारे गिफ्ट हे हटके आणि खास असेल असा विचार केला. तेव्हा कथेरिया यांनी इंटरनॅशनल लूनार लँन्ड रजिस्ट्री नावाच्या कंपनी सोबत संपर्क साधला आणि 13 मार्चला चंद्रावर जमीन खरेदी करण्यासंदर्भात ऑनलाईन अर्ज केला. एक एकर जमीन खरेदीचा अर्ज कंपनीकडून स्विकार करण्यात आला. त्यानंतर कंपनीने सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आणि कथेरिया यांना चंद्रावर जमीन खरेदीची मंजूरी दिल्याचा ईमेल केला. कथेरिया यांना कंपनी संबंधित सर्व कागदपत्र सुद्धा पाठवण्यात आले.(अहो आश्चर्यम ! पुण्यातील महिलेने 50 हजारात चक्क चंद्रावर घेतली एक एकर जमीन)
दरम्यान, विजय कथेरिया हे चंद्रावर जमीन खरेदी करणारे पहिलेच व्यापारी आहे. तर नित्या ही जगातील सर्वाधिक कमी वयाची मुलगी असून तिच्या नावावर चंद्रावर जमीन खरेदी केली गेली आहे. असा दावा करण्यात आला आहे की, येणाऱ्या दिवसात कंपनीकडून अधिकृतरित्या या दाव्याची घोषणा केली जाणार आहे.