Ahmedabad Bomb Blast Case: अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरणात दोषी 38 जणांना फाशी, 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा

अहमदाबाद बॉम्बस्फोट (Ahmedabad Serial Blast 2008) प्रकरणात विशेष न्यायालयाने (City Civil Court) दोषी 38 जणांना फाशीची शिक्षा ठोठावली आहे. विशेष न्यायाधीश ए आर पटेल यांच्या खंडपीठाने या खटल्यातील 78 आरोपींपैकी 49 जणांना दोषी ठरवले. त्यापैकी 11 जणांना जन्मठेप तर 38 जणांना फाशीची शिक्षा ठोठावली. न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला होता.

Ahmedabad Bomb Blast Case: अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरणात दोषी 38 जणांना फाशी, 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा
Court Hammer | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

अहमदाबाद बॉम्बस्फोट (Ahmedabad Serial Blast 2008) प्रकरणात विशेष न्यायालयाने (City Civil Court) दोषी 38 जणांना फाशीची शिक्षा ठोठावली आहे. विशेष न्यायाधीश ए आर पटेल यांच्या खंडपीठाने या खटल्यातील 78 आरोपींपैकी 49 जणांना दोषी ठरवले. त्यापैकी 11 जणांना जन्मठेप तर 38 जणांना फाशीची शिक्षा ठोठावली. न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला होता. आज या निकालाचे वाचन झाले. न्यायालयाने बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायदा (Unlawful Activities (Prevention) Act) अन्वये हा निर्णय दिला. या प्रकरणातील 29 आरोपींची सबळ पुराव्या अभावी मुक्तता करण्यात आली आहे.

अहमदाबादमध्ये 26 जुलै 2008 मध्ये साधारण 70 मिनीटांच्या कालावधीत सुमारे 21 बॉम्बस्फोट झाले होते. ज्यामुळ संपूर्ण अहमदाबाद शहर हादरुन गेले. शहरात झालेल्या या बॉम्बस्फोटात तब्बल 56 नागरिकांचे प्राण गेले. तर 200 लोक गंभीर जखमी झाले आहेत. या संपूर्ण बॉम्बस्फोट प्रकरणाची चौकशी झाली. 80 आरोपींवर खटला चालला. पोलिसांनी अहमदाबाद मध्ये 20 गुन्हे दाखल केले होते. तर इतर 15 गुन्हे सूरतमध्ये दाख झाले होते. अहमदाबाद येथून विविध ठिकाणांहून जिवंत बॉम्बही ताब्यात घेण्यात आले होते. (हेही वाचा, Ahmedabad Serial Blast Case: अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट, 49 जण दोषी, 28 जणांची निर्दोश सुटका; कोर्ट उद्या ठोठावणार सजा)

ट्विट

अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोटानंतर सूरत पोलिसांनी 28 जुलै आणि 31 जुलै 2008 मध्ये शहरातील विविध ठिकाणी 29 बॉम्ब जप्त केले. पोलीस तपासात असेही स्पष्ट झाले की, चुकीचे सर्कीट आणि टेटोनेटर यामुळे हे बॉम्ब फुटले नाहीत. नाहीतर आणखी मोठा नृरसंहार घडला असता.

(The above story first appeared on LatestLY on Feb 18, 2022 12:02 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).