Ahmedabad Plane Crash: टाटा ग्रुपनंतर एअर इंडियानेही जाहीर केली भरपाई; विमान अपघातातील पीडितांच्या कुटुंबियांना मिळणार 25 लाख रुपये
सध्या या अपघाताची चौकशी सुरू आहे. त्याच वेळी, एअर इंडियाने अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना आणि जखमींना आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे.
Ahmedabad Plane Crash: अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातामुळे (Ahmedabad Plane Crash) सर्वांनाचं मोठा धक्का बसला आहे. अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच एअर इंडियाचे विमान कोसळले (Air India Plane Crash). या विमानात 242 जण होते, यापैकी 241 जणांचा मृत्यू झाला. तथापी, हे विमान रुग्णालयाच्या वसतिगृहावर कोसळले, ज्यामुळे तेथे राहणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तसेच अनेक जण जखमी झाले. सध्या या अपघाताची चौकशी सुरू आहे. त्याच वेळी, एअर इंडियाने अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना आणि जखमींना आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे.
एअर इंडियाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एका पोस्टमध्ये नुकसान भरपाईची घोषणा केली आहे. एअर इंडियाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'अलिकडच्या अपघातात जीव गमावलेल्या प्रवाशांच्या कुटुंबियांच्या पाठीशी एअर इंडिया एकजुटीने उभी आहे. या अविश्वसनीय कठीण काळात आमची टीम काळजी आणि आधार देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.' (हेही वाचा - Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातस्थळी मृत्युमुखी पडलेल्या 33 नागरिकांच्या कुटुंबियांना टाटा समूहाकडून 1 कोटी रुपयांची भरपाई जाहीर)
एअर इंडियाकडून भरपाई जाहीर -
एअर इंडियाने पुढे म्हटलं आहे की, 'आमच्या सततच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, एअर इंडिया मृतांच्या आणि वाचलेल्यांच्या कुटुंबियांना तात्काळ आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी 25 लाख किंवा अंदाजे 21,000 GBP चे अंतरिम पेमेंट देईल. हे टाटा सन्सने आधीच जाहीर केलेल्या 1 कोटी किंवा अंदाजे 85,000 GBP च्या मदतीव्यतिरिक्त आहे. तथापी, एअर इंडियाने या अपघातानंतर झालेल्या नुकसानीमुळे आपण सर्वजण दुःखी असल्याचंही पोस्टमध्ये म्हटलं आहे. (हेही वाचा - DGCA Orders Boeing 787 Inspection: अहमदाबाद दुर्घटनेनंतर 'डीजीसीए'ला खडबडून जाग, बोईंग 787 विमानांची तातडीने सुरक्षा तपासणीचे आदेश)
टाटा समूहाकडून भरपाई जाहीर -
दरम्यान, यापूर्वी टाटा सन्सने भरपाईची घोषणा केली आहे. टाटा ग्रुपने एका पोस्टमध्ये लिहिले आहे की, या दुर्घटनेत जीव गमावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबियांना 1 कोटीची मदत टाटा ग्रुप देईल. आम्ही जखमींचा वैद्यकीय खर्च देखील उचलू. याव्यतिरिक्त टाटा समूहाने बीजे मेडिकलच्या वसतिगृहाच्या बांधकामात मदत करण्याचे आश्वासनही दिले आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)