मातीचे पाय?: भाजपच्या पारदर्शी कारभाराला तडे; लाच प्रकरणात ३ मंत्र्यांच्या स्वीय सहायकांना अटक
त्यातील एकनाथ खडसे यांच्यासारख्या बलाढ्य नेत्याला आपल्या मंत्रीपदाचा राजीनामाही द्यावा लागला आहे. त्यामुळे भाजपच्या पारदर्शी कारभाराला तडे गेल्याची चर्चा आहे.
'पार्टी विथ डिफरन्स' म्हणत पारदर्शी कारभाराचा दावा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचेही (BJP) पाय मातीचेच असल्याचे पुन्हा एकदा पुढे आहे. उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) बहुचर्चित योगी आदित्यनाथ (Adityanath) सरकारमधील तीन मंत्र्यांच्या स्वीय सहायकांना लाच (Bribes) प्रकरणात थेट अटक झाली आहे. त्यामुळे योगी सरकार अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. विधानसभेच्या परिसरात हे 3 जण अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि कंत्राट मिळवून देण्याबाबतचे हे प्रकरण आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या भाजप सरकारमधीलही अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. त्यातील एकनाथ खडसे यांच्यासारख्या बलाढ्य नेत्याला आपल्या मंत्रीपदाचा राजीनामाही द्यावा लागला आहे. त्यामुळे भाजपच्या पारदर्शी कारभाराला तडे गेल्याची चर्चा आहे.
एका खासगी वृत्तवाहिनीने केलेल्य स्टिंग ऑपरेशननंतर तीन मंत्र्यांच्या स्वीय सहायकांवर कारवाई करत अटक करण्यात आली. बदल्य आणि कंत्राट मिळवून देण्याबाबतच्या प्रकरणात लाच स्वीराकरताना या स्वीय सहायक रंगेहात सापडले. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी त्यांना न्यायालासमोर उभे केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. (हेही राफेल डील: मोदी सरकारला अडचणीत आणणारे राहुल गांधी यांचे ५ प्रश्न
मंत्र्यांचे अटक करण्यात आलेले स्वीय सहायक
मंत्र्याचे नाव | मंत्रालय | अटक करण्यात आलेलेल्या स्वीय साहायकाचे नाव |
ओमप्रकाश राजभर | मागास वर्ग कल्याण | ओमप्रकाश कश्यप |
अर्चना पांडेय | उत्खनन मंत्री | एस पी त्रिपाठी |
संदीप सिंह | मूलभूत शिक्षण | संतोष अवस्थी |
प्राप्त माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील हजरतगंज पोलिसांनी ही कारवाई केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आहे. त्यांनी अटक करण्यात आलेल्या तीनही मंत्र्यांना निलंबीत केले आहे. तसेच, या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी नेमण्याचाही निर्णय घेतला आहे. लखनौ येथील अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश राजीव कृष्णा यांच्या अध्यक्षतेखाली ही एसआयटी काम करेन. एसटीएफचे पोलिस महानिरीक्षक आणि आयटीचे विशेष सचिव राकेश वर्मा यांचाही या एसआयटीत समावेश आहे.