जम्मू कश्मीर च्या विभाजनानंतर दार्जिलिंग देखील पश्चिम बंगाल पासून वेगळं करण्यासाठी मागणी
जम्मू कश्मीरच्या विभाजनानंतर दार्जिंलिंग राज्यालादेखील केंद्रशाशित प्रदेशाचा दर्जा मिळावा म्हणून मागणी होत आहे.
जम्मू कश्मीरमध्ये (Jammu & Kashmir)कलम 370 रद्द केल्यानंतर जम्मू कश्मीरचं विभाजन झालं आहे. लद्दाख या राज्याला देखील केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर केलं आहे. आता जम्मू कश्मीरच्या विभाजनानंतर दार्जिंलिंग राज्यालादेखील केंद्रशाशित प्रदेशाचा दर्जा मिळावा म्हणून मागणी होत आहे. जम्मू-कश्मीर मधून कलम 370 हटवल्याने राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात- राहुल गांधी
दार्जिलिंगचे भाजपा खासदार राजू बिस्ट यांनी संसदेत दिलेल्या माहितीनुसार, 2024 पर्यंत दार्जिलिंगलाही विधानसभेसह केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्याबाबत माहिती दिली आहे. मात्र पश्चिम बंगालच्या विभाजनाला विरोध केला आहे.
भाजपाच्या अनेक नेत्यांनी यावर बोलण्यावर टाळलं आहे. मात्र त्यांनी या प्रलंबित मागणीवर केंद्र सरकार लवकरच तोडगा काढेल असा विश्वास व्यक्त केला आहे. जम्मू कश्मीर मध्ये Article 370 रद्द झाल्यानंतर भौगोलिक रचना,राष्ट्रध्वज यांच्यासोबत बदलणार या '10' गोष्टी
दार्जिलिंगला वेगळं राज्य बनवण्याची मागणी करणार्या बिमल गुरूंग यांच्या नेतृत्त्वाखाली गोरखा जनमुक्ति मोर्चा (JJM)च्या धडे यांनी सांगितले की भाजपाने पर्वतीय भागामध्ये निवडणूकीदरम्यान केलेल्या वचनांची पूर्तता करणं गरजेचे आहे. वेगळ्या राज्याची मागणी करताना 2017 मध्ये 104 दिवस उपोषण केलं होतं. हे आंदोलन हिंसक बनलं होतं. आंदोलनादरम्यान अनेक स्थानिकांचे, पोलिसांचा मृत्यू झाला होता.