कौतुकास्पद! सीरम इन्स्टिट्यूटचे Adar Poonawalla ठरले Asian of the Year; कोरोना व्हायरसविरुद्धच्या लढ्यात दिले मोठे योगदान

जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (Serum Institute of India) सीईओ अदार पूनावाला (Adar Poonawalla) यांना 'एशियन ऑफ दी इयर' (Asian of the Year) म्हणून निवडले गेले आहे.

SII CEO Adar Poonawalla | (Photo Credits: ANI)

जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (Serum Institute of India) सीईओ अदार पूनावाला (Adar Poonawalla) यांना 'एशियन ऑफ दी इयर' (Asian of the Year) म्हणून निवडले गेले आहे. सिंगापूरमधील ‘द स्ट्रेट्स टाईम्स’ (The Straits Times) या संस्थेने पुनावाला यांच्यासह सहा जणांना ‘एशियन ऑफ द इयर’ सन्मानासाठी निवड केली आहे. यावर्षी कोविड-19 साथीविरूद्ध लढा देण्यामध्ये योगदान दिल्याबद्दल या सहा लोकांची निवड झाली आहे. पुण्यातील जगातील सर्वात मोठी लस कंपनी सीरम इन्स्टिट्यूटने कोरोनाची लस तयार करण्यासाठी युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफोर्ड (University of Oxford) आणि ब्रिटीश-स्वीडिश औषधनिर्माण संस्था अ‍ॅस्ट्रॅजेनेका (AstraZeneca) यांच्याशी हातमिळवणी केली आहे.

सीरम संस्था कोरोना लस कोविशील्ड (Covishield) मोठ्या प्रमाणात तयार करेल. ही संस्था भारतातही त्याची चाचणी घेत आहे. 39 वर्षीय पुनावाला यांच्यासोबत या सन्मानासाठी निवडण्यात आलेल्या पाच लोकांमध्ये, चीनचे संशोधक Zhang Yongzhen आणि मेजर जनरल Chen Wei, जपानचे Dr. Ryuichi Morishita, सिंगापूरचे प्रोफेसर Ooi Eng Eong आणि दक्षिण कोरियाचे व्यापारी Seo Jung-jin यांचा समावेश आहे. या सर्वांना ‘व्हायरस बस्टर्स’ असे नाव देण्यात आले आहे. वृत्तानुसार, सध्याच्या धोकादायक काळात या लोकांनी केवळ आशियाच नव्हे तर जगासाठी आशा निर्माण केल्या आहेत. (हेही वाचा: Covaxin लस घेऊनही हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर Bharat Biotech ने दिले 'हे' स्पष्टीकरण)

दरम्यान, 1966 मध्ये अदार पूनावाला यांचे वडील सायरस पूनावाला यांनी सीरम संस्थेची स्थापना केली. अदार पूनावाला लंडनच्या वेस्टमिन्स्टर विद्यापीठातून पदवीधर झाले. त्यानंतर ते 2001 मध्ये कंपनीमध्ये रुजू झाले आणि 2011 मध्ये सीईओ झाले. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, संस्थेची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी त्यांनी आपल्या कुटुंबातून 250 दशलक्ष डॉलर्स दिले आहेत. त्यांची संस्था गरीब देशांना मदत करणार आहे जेणेकरुन सहजपणे अशा देशांपर्यंत कोरोना लस पोहोचू शकेल.