Adani Electricity चे शनिवारी रात्री 8.30 ते 9.30 दरम्यान वीज पुरवठा बंद ठेवून Earth Hour मध्ये सामील होण्याचे आवाहन
गुरुवारी, अदानी इलेक्ट्रिसिटीने (Adani Electricity) नागरिकांना, विशेषत: शहरातील त्यांच्या सुमारे 29 लाख ग्राहकांना शनिवारी रात्री 8.30 ते 9.30 दरम्यान घर आणि कार्यालयातील सर्व वीज पुरवठा स्वेच्छेने बंद ठेवून 'अर्थ अवर' (Earth Hour) मध्ये सामील होण्याचे आवाहन केले
गुरुवारी, अदानी इलेक्ट्रिसिटीने (Adani Electricity) नागरिकांना, विशेषत: शहरातील त्यांच्या सुमारे 29 लाख ग्राहकांना शनिवारी रात्री 8.30 ते 9.30 दरम्यान घर आणि कार्यालयातील सर्व वीज पुरवठा स्वेच्छेने बंद ठेवून 'अर्थ अवर' (Earth Hour) मध्ये सामील होण्याचे आवाहन केले. याद्वारे शाश्वत भविष्य घडविण्याच्या दिशेने पाठींबा दर्शवण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. मुंबई परिसरामध्ये वीज पुरवठा करणारी अदानी एक मोठी कंपनी आहे. ही वीज वितरण कंपनी पयार्वरणाच्या संवधर्नासाठी जाणीवपूवर्क प्रयत्न करत आहे.
याबाबत अदानी इलेक्ट्रिसिटीच्या प्रवक्त्याने सांगितले की, 'अर्थ अवरच्या पुढाकाराने आम्हाला आमच्या सर्व भागधारकांमध्ये शाश्वत जीवनाचे महत्व रुजवायचे आहे. अदानी कंपनीमध्ये आमचा विश्वास आहे की संसाधनांचे जतन करणे आणि त्यांचा कार्यक्षमतेने उपयोग करणे महत्वाचे आहे,' जागतिक हवामान संघटनेच्या म्हणण्यानुसार 2016 मध्ये सर्वात गरम वर्ष बनविणारी विक्रमी उष्णता ही 2017 मध्ये कायम राहिली. यासाठी ग्लोबल वार्मिंग आणि बेपर्वा व अविरत वीज वापरणे, हे कारण असल्याचेही कंपनीने म्हटले आहे. (हेही वाचा: कमाईच्या बाबतीत Gautam Adani यांनी Elon Musk, Jeff Bezos यांनाही टाकले मागे; नेट वर्थच्या वाढीबाबत ठरले अव्वल)
दरम्यान, भारतीय उद्योजक गौतम अदानी सुमारे दोन दशकांपर्यंत कोळशाच्या क्षेत्रात व्यवसाय करत होते, त्यानंतर आता ते इतर क्षेत्रातही आपला व्यवसाय वाढविण्याच्या विचारात आहेत. भारतातील पायाभूत सुविधा मजबूत करण्याच्या क्षेत्रात अदानी हे एक मोठे नाव म्हणून उदयास आले आहे. त्यामुळे त्यांना 'इन्फ्रास्ट्रक्चर किंग' असेही म्हटले जाते. त्यांचा व्यवसाय बंदरांपासून खाणींपर्यंत आहे. याव्यतिरिक्त, त्यांच्या व्यवसायात अनेक उर्जा प्रकल्प, विमानतळ, डेटा सेंटर आणि संरक्षण क्षेत्र यांचा समावेश आहे. गुंतवणूकदारही अदानी यांना पूर्ण पाठिंबा देत आहेत, म्हणूनच ते इथपर्यंत मजल मारू शकले.