Telangana BRS Leader आणि मुलाचा अपघाती मृत्यू, Narsingi येथे धक्कादायक घटना

नियंत्रण गमावल्याे कार दुभाजकाला धडकली आणि रस्त्याच्या विरुद्ध दिशेने गेली, तिथे एका लॉरीने कारला धडक दिली.'

Accident (PC - File Photo)

भारत राष्ट्र समितीचे (BRS) नेते थौर्या नायक (Thourya Nayak) आणि त्यांचा मुलगा अंकित यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी (21 जुलै) नरसिंगी ते चेगुंता दरम्यान घडली. पोलिसांनी माहिती देताना सांगितली की, ही घटना नरसिंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. पोलिसांनी सांगितले की, 'थोर्या नायक आणि त्यांचा मुलगा अंकित हे नरसिंगी गावातून चेगुंता येथे जात असताना त्यांच्या कारचा टायर फुटला. नियंत्रण गमावल्याे कार दुभाजकाला धडकली आणि रस्त्याच्या विरुद्ध दिशेने गेली, तिथे एका लॉरीने कारला धडक दिली.'

पोलिसांनी सांगितले की, या घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला. मृतदेह रामायणपेठच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आले आहेत. कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सुरु आहे. (हेही वाचा, NCP Leader Ghar Wapsi From BRS: KCR यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांवर डल्ला, अनिल देशमुख यांच्यामुळे तीन दिवसांत 'घरवापसी')

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात खूपच भीषण होता. ज्यामध्ये 45 वर्षीय थौर्या नायक आणि त्यांच्या 19 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. थौर्य नायक हे नरसिंगी येथील बीआरएसचे अध्यक्ष होते. याशिवाय त्यांनी इतर पदांवरही काम केले होते. वाहनामध्ये मृतदेह इतक्या वाईट पद्धतीने अडकले होते की, काही वेळा वाहनाचा भाग आणि काही वेळी मृतदेहाचा भाग कापून काढावा लागला.