Chhatrapati Sambhaji Nagar Accident: शिवाई बस आणि कारची धडक; चालकाचा जागीच मृत्यू, 6 गंभीर जखमी

छत्रपती संभाजीनगर - अहमदनगर रस्त्यावरील वाळूजजवळ घडला. एसटी महामंडळाच्या शिवाई बसने एका कारला पाठीमागून जोरदार धडक दिली.

Chhatrapati Sambhaji Nagar Accident: शिवाई बस आणि कारची धडक; चालकाचा जागीच मृत्यू, 6 गंभीर जखमी
Accident (PC - File Photo)

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाच्या बसला वारंवार अपघात होत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील बसचा अपघात झाला आहे. अहमदनगरकडून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने येत असलेल्या इलेक्ट्रिक शिवाई बस आणि एका खाजगी कारचा भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात कारचालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर सहा जण गंभीर जखमी आहेत. जखमींना स्थानिकांच्या मदतीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  (हेही वाचा - Mumbai: घरमालकांनी भाडेकरूंची माहिती सिटीझन पोर्टलवर कळविणे आवश्यक; आदेशाचे उल्लंघन केल्यास होणार कारवाई)

छत्रपती संभाजीनगर - अहमदनगर रस्त्यावरील वाळूजजवळ घडला. एसटी महामंडळाच्या शिवाई बसने एका कारला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेमुळे कार रस्ताच्या बाजूला असलेल्या शेतात जाऊन उलटली. सय्यद जावेद सय्यद हनीफ असे मृत कारचालकाचे नाव आहे. सर्वजण एकाच परिवारातले असून बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथील हे रहिवासी आहेत अशी माहिती समोर आली आहे. जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातात कार आणि बस या दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  धडकेमुळे कार रस्ताच्या बाजूला असलेल्या शेतात जाऊन उलटली. या अपघातात कारचालक सय्यद जावदे सय्यद हनीफ याचा जागीच मृत्यू झाला.

 

 

(The above story first appeared on LatestLY on Jul 18, 2023 10:06 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).