धक्कादायक! कुत्रीच्या प्रेमप्रकरणामुळे मालकाचा संताप; शेजाऱ्या कुत्र्यासोबत अनैतिक संबंध ठेवल्यामुळे घराबाहेर हाकलले

या चिठ्ठीनुसार या कुत्रीचे शेजारच्या कुत्र्यासोबत अनैतिक संबंध होते म्हणून तिला सोडून देण्यात आले आहे. पीपल फॉर एनिमल्स या संस्थेच्या स्वयंसेवीकेला ही कुत्री आढळून आली.

Abandoned Pet Pomeranian (Photo Credits: Sreedevi S Kartha‎/ Facebook)

कुत्रे हे जनावर सर्वात एकनिष्ठ जनावर म्हणून ओळखले जाते. अनेकजण स्वतःचे एकटेपण दूर करण्यासाठी घरात कुत्रे पाळतात. मात्र केळरमध्ये एक मालकाने आपल्या पोमेरियन (Pomeranian) कुत्रीला रस्त्यावर सोडून दिले आहे. तिच्या गळ्यात एक चिठ्ठी अडकवून कुत्रीला सोडण्याचे कारण लिहिण्यात आले आहे. या चिठ्ठीनुसार या कुत्रीचे शेजारच्या कुत्र्यासोबत अनैतिक संबंध होते म्हणून तिला सोडून देण्यात आले आहे. पीपल फॉर एनिमल्स या संस्थेच्या स्वयंसेवीकेला ही कुत्री आढळून आली.

ही घटना केरळ राज्यातील तिरुअनंतपुरम (Thiruvananthapuram) येथे घडली आहे. रविवारी रात्री शमीम फ़ारूक़ यांना ही कुत्री सापडली. या कुत्रीच्या गळ्यात तिच्या बद्दल काही माहिती लिहिली होती, ‘हिचे चांगल्या प्रकारे पालन पोषण केले गेले आहे. ही जास्त जेवत नाही. जेवणात हिला दूध, कच्चे अंडे आणि बिस्कीट आवडते. ही पाच दिवसातून एकदा अंघोळ करते. गेल्या तीन वर्षांपासून ही रोगमुक्त आहे व तिने कोणाचाही चावा घेतला नाही. एकच वाईट गोष्ट म्हणजे ही सतत भुंकत राहते. आता मी हिला सोडत आहे कारण हिचे शेजारच्या कुत्र्यासोबत अनैतिक संबंध आहेत.’ (हेही वाचा: Pomeranian कुत्रीवर सामूहिक बलात्कार, तीन पुरुषांना अटक; Female Dog च्या अंगावर जखमा, प्रकृती गंभीर)

या कारणामुळे कोणी आपल्या कुत्रीला सोडू शकते यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. सध्या ही संस्था आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासात आहे, जेणेकरून हिला कोणी सोडून दिले ते समजेत. त्या व्यक्तिला अधिनियम कायद्याअंतर्गत शिक्षा होऊ शकते. धारा 11 (1) च्या कलम 1960 च्या अनुसार, ‘एखाद्या प्राण्याला अनाथ करून सोडून देणे, त्याला अन्न पाण्यासाठी तडपत ठेवणे हा गुन्हा दंडनीय आहे.’