Pune Crime: दारू पिल्याची आईकडे तक्रार केल्याने मित्राची केली हत्या, दोन आरोपींना अटक
पुणे शहरातील हडपसर परिसरात दारू पिण्याच्या सवयीची सतत पत्नी आणि आईकडे तक्रार केल्याने एकाने आपल्या मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना हडपसर परिसरातील पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रामोशी अली येथे घडली.
Pune Crime: पुणे शहरातील हडपसर परिसरात दारू पिण्याच्या सवयीची सतत पत्नी आणि आईकडे तक्रार केल्याने एकाने आपल्या मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना हडपसर परिसरातील पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रामोशी अली येथे घडली. (हेही वाचा- घरकामाला आलेल्या मुलीने चोरले 8 लाखाचे दागिने; इंस्टाग्राम वर चोरलेल्या दागिन्यांचे फोटो टाकल्यानंतर लागला छडा)
मिळालेल्या माहितीनुसार, अमोल उर्फ मारुती माने असं मृताचे नाव आहे. वैभव गणेश लबडे आणि ज्ञानेश्वर दत्तू अशी आरोपींची नावे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि मृत तरुण मित्र होते. अमोल नेहमी वैभवच्या घरी जायचा. तर वेळीस घरी जाऊन अमोलच्या दारू पिण्याच्या सवयी संदर्भात आई आणि त्याच्या पत्नीला तक्रार करत असे. हीच गोष्ट वैभवला खटकली. वैभवने त्याचा मित्र ज्ञानेश्वर सोबत अमोलच्या हत्येचा कट रचला.
अमोलच्या राहत्या घरी दोघे ही गेले आणि तेथे वाद घातला. तेवढ्यात वैभवने अमोलच्या डोक्यात लोखंडी रॉड घातला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. दोघे ही घटनास्थळावरून फरार झाले. अमोलला त्याच्या बहिणीने फोन केला. पण बराच वेळ त्यांने फोन उचलला नाही त्यामुळे तीनं शेजाऱ्यांना अमोलच्या घरी जायला सांगितले. अमोल रक्त बंबाळ अवस्थेत पडून होता.
घटनेची माहिची त्यांने अमोलच्या बहिणीला आणि पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेह ताब्यात घेतले. मृताचा पंचनामा करत आरोपींवर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी काही तासांच्या आत आरोपींना अटक केले. चौकशीत हत्येचे कारण समोर आले आहे अशी माहिती पोलिसांनी दिली.
(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

