Mumbai Crime: दोन मुलांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी पालकांवर गुन्हा दाखल, गोरेगाव येथील घटना

या व्हायरल व्हिडिओनंतर गोरेगाव येथील वनराई पोलिसांनी बाल न्याय कायदा २०१५ अंतर्गत आईसोबत वडिलांवर देखील गुन्हा दाखल केला आहे.

Crime, FIR | Archived, Edited, Symbolic Images)

Mumbai Crime: आई आपल्या मुलांना बेल्टने बेदम मारहाण करत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओनंतर गोरेगाव येथील वनराई पोलिसांनी बाल न्याय कायदा २०१५ अंतर्गत आईसोबत वडिलांवर देखील गुन्हा दाखल केला आहे. हा व्हिडिओ मुलांची वडिलांनी रेकॉर्ड केला होता. (हेही वाचा- अल्पवयीन मुले वाहन चालवताना आढळल्यास पालकांना होणार शिक्षा; 25,000 रुपयांपर्यंत दंडाची तरतूद, पोलिसांनी दिला इशारा)

मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश शाहरुख काथावाला यांनी पोलिस राज्य मानवाधिकार आयोग आणि राज्य बाल हक्क आयोग यांना महिलेवर कारवाई करण्याची विंनती केली. अधिक माहितीनुसार, हे जोडपे पारसी पंचायत कॉम्प्लेक्स गोरेगाव पूर्व येथे राहतात. त्यांना १३ वर्षाची मुलगी आणि नऊ वर्षाचा मुलगा आहे. ही घटना २०२२ मधील असल्याचे बोलले जात आहे.

प्रकल्प समन्वयक जितेंद्र चौगुले आणि जिल्हा चाइल्ड हेल्पलाइनच्या पर्यवेक्षक शोभा आगाशे यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी या व्हिडिओचा शोध घेतला आणि जोडप्याच्या घरी भेट दिली. पोलिसांनी यावेळी मुलांचा जबाब नोंदवला. मुलांनी पोलिसांना २०२२ मध्ये घडलेल्या घटनेची माहिती दिली. आईने रागाच्या भरात तिला मारहाण केली. पोलिसांसमोर मारहाण करणाऱ्या आईने देखील कबुली दिली.

९ जुलै रोजी पोलिसांनी आई आणि वडिलांविरुध्द बाल न्याय कायद्याच्या कलम ७५ आणि कलम ३२४ (खतरनाक शस्त्रे किंवा साधनांनी स्वेच्छेने दुखापत करणे) आणि सोबत एफआयआर नोंदवला. या प्रकरणी पोलिस पुढील कारवाई करत आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif