Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात दरीत कोसळली कार; 10 महिन्यांच्या बाळासह तिघांचा मृत्यू

त्यानंतर स्थानिक लोक पीडितांना वाचवण्यासाठी घटनास्थळी पोहोचले, जिथे त्यांना तीन जणांचा मृत्यू झाल्याचं आढळलं. कारमधील प्रवासी मलिकोट गावातून चासणाकडे जात असताना चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि नंतर कार खोल खड्ड्यात पडली.

Accident प्रतिकात्मक प्रतिमा (फोटो सौजन्य - फेसबुक)

Jammu and Kashmir: जम्मू आणि काश्मीर (Jammu and Kashmir) मधील रियासी जिल्ह्यात (Reasi District) शनिवारी सकाळी झालेल्या भीषण रस्ता अपघातात (Accident) 10 महिन्यांच्या बाळासह तिघांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात चामलू वळणाजवळील चासाना भागात झाला. अपघातात कार डोंगरावरून खाली घसरली आणि खोल खड्ड्यात पडली. काही अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी पोहोचून अपघाताचा आढावा घेतला.

या अपघाताची माहिती देताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, हा अपघात शनिवारी चमलू वळणावर झाला. त्यानंतर स्थानिक लोक पीडितांना वाचवण्यासाठी घटनास्थळी पोहोचले, जिथे त्यांना तीन जणांचा मृत्यू झाल्याचं आढळलं. कारमधील प्रवासी मलिकोट गावातून चासणाकडे जात असताना चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि नंतर कार खोल खड्ड्यात पडली. (हेही वाचा - Udhampur Bus Road Accident: जम्मू-काश्मीरमधील उधमपूरमध्ये अपघात, प्रवाशांनी भरलेली मिनी बस रस्त्यावरून घसरून खड्ड्यात पडली, सुमारे 5 जण जखमी)

या अपघातात कुल्चा देवी (27), तिचा 10 महिन्यांचा मुलगा नीरज सिंग आणि पुतण्या संधुर सिंग (23) यांचा जागीच मृत्यू झाला. कुलचा देवी यांचे पती छंकर सिंग (32), दिर धुनकर (19) आणि पुतण्या अजय सिंग (18) यांना स्थानिक लोकांनी रुग्णालयात नेले, जिथे त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातानंतर नागरिकांनी प्रशासनाला घेराव घालून प्रश्न उपस्थित करत परिसरातील रस्त्यांची दुरवस्था आणि प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन चिंता व्यक्त केली. (हेही वाचा -Ghaziabad Road Accident: गाझियाबादमध्ये भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला दिली धडक, 4 ठार, 24 जखमी)

दरम्यान, या अपघातानंतर रस्त्याची स्थिती सुधारावी, भविष्यात असे अपघात होऊ नयेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून अपघाताचे कारण शोधण्यासाठी आवश्यक ती कारवाई सुरू केली आहे.