Tomato Price Increase: मुसळधार पावसामुळे टोमॅटोचे दर कडाडले, 100-120 रुपये प्रति किलोपर्यंत भाव
दरम्यान, वाढत्या दरात शेतकऱ्यांना फायदा होत आहे. मात्र, ग्राहकांना फटका बसत आहे. दिल्लीत टोमॅटोच्या किरकोळ किंमती 100 रुपये किलोच्या पुढे गेल्याचे सांगण्यात येत आहे.
टोमॅटोच्या दरात मोठी वाढ झाली आहे. टोमॅटो उत्पादक राज्यांमध्ये अतिवृष्टीमुळं त्याचा पुरवठा विस्कळीत होत आहे. त्यामुळं किरकोळ विक्रीच्या किमती झपाट्यानं वाढत आहेत. देशाची राजधानी दिल्लीत (Delhi) टोमॅटोचे दर हे 100 रुपये किलोच्या पुढे गेले आहेत. येत्या काही दिवसात टोमॅटोचे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. देशाच्या अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळ टोमॅटो पुरवठ्याची साखळी विस्कळीत झाली आहे. तसेच अनेक भागात पावसामुळं पिकांचं देखील नुकसान झालं आहे. (हेही वाचा - Farmer Suicide in Maharashtra: राज्यात 6 महिन्यात 1,267 शेतकऱ्यांच्या आत्महत्या; अमरावती विभागात सर्वाधिक संख्या)
दरम्यान, वाढत्या दरात शेतकऱ्यांना फायदा होत आहे. मात्र, ग्राहकांना फटका बसत आहे. दिल्लीत टोमॅटोच्या किरकोळ किंमती 100 रुपये किलोच्या पुढे गेल्याचे सांगण्यात येत आहे. अशातच प्रतिकूल हवामानामुळे बाजारात टोमॅटोची विक्री झाली आहे. निवारी दिल्लीच्या किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर 100 रुपये किलोवर पोहोचले. सरकारी आकडेवारीनुसार 20 जुलै रोजी दिल्लीत टोमॅटोच्या दैनिक सरासरी किरकोळ किमती 93 रुपये प्रति किलो होत्या. सरकारी आकडेवारीनुसार, 20 जुलै रोजी टोमॅटोची राष्ट्रीय सरासरी किंमत 73.76 रुपये प्रति किलो होती.
उष्णतेच्या लाटेनंतर झालेल्या मुसळधार पावसामुळे टोमॅटोचे भाव वाढत आहेत. मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेशातून किरकोळ बाजारात टोमॅटोचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे टोमॅटोचे भाव झपाट्याने वाढत आहेत. प्रतिकूल हवामानामुळे टोमॅटो व्यतिरिक्त दिल्लीत बटाटे आणि कांद्याच्या किमतीही वाढत आहेत. दिल्लीत कांद्याचे दर हे 46.90 रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचले होते. बटाटा 41.90 रुपये किलो दराने विकला जात आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jul 21, 2024 07:12 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

