मात न तू वैरिणी! अवघ्या 3 महिन्याच्या बाळाला आईने रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली फेकले; समोर आले धक्कादायक कारण
ती एका खांबाजवळ काही वेळ उभी राहिली, नंतर रिकाम्या हाताने वॉर्डात परतली.
लहान बाळाची क्रूरपणे हत्या करण्यात आल्याची घटना गुजरातमध्ये उघडकीस आले आहे. अहमदाबाद (Ahmedabad) येथे हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावरून तीन महिन्यांच्या चिमुरडीला फेकल्याप्रकरणी एका महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. आसिफमिया शेख यांनी नोंदवलेल्या तक्रारीनुसार, त्यांची पत्नी फरजानाबानू हिने 5 ऑक्टोबर 2022 रोजी आनंद जिल्ह्यातील उत्तरसांडा येथील रुग्णालयात बाळाला जन्म दिला होता.
त्यानंतर रविवारी सकाळी फरझानबानूने आपली मुलगी बेपत्ता झाल्याचे पतीला सांगितले. शेख यांच्यासह रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी बाळाचा शोध घेतला आणि पोलिसांनाही याची माहिती दिली.
तक्रारीत असिफमियाने म्हटले आहे की, हॉस्पिटलचे सीसीटीव्ही फुटेज तपासत असताना पहाटे 4 वाजता फरझानाबानू बाळाला हातात घेऊन वॉर्डातून बाहेर येताना दिसली. ती एका खांबाजवळ काही वेळ उभी राहिली, नंतर रिकाम्या हाताने वॉर्डात परतली. पोलिसांच्या चौकशीत आरोपी महिलेने सांगितले की, ती बाळाच्या आजारपणाला आणि वेदनांना कंटाळली होती, त्यामुळे बाळाला हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावरून त्याला खाली फेकण्याचे हे कठोर पाऊल उचलले. (हेही वाचा: नव्या वर्षाच्या पहिल्याचं दिवशी राजधानी पुन्हा हादरली! दिल्लीच्या रस्त्यावर तरुणीला ८ किमी फरफटत नेल)
रुग्णालयाच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तपासणी केली असता त्यांना बाळाचा मृतदेह आढळून आला. दरम्यान, जन्मानंतर, बाळाला 15 दिवस वडोदरा येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यानंतर 14 डिसेंबर रोजी कुटुंबाच्या लक्षात आले की तिचे पोट वाढले आहे आणि त्यानंतर नडियाद डॉक्टरांच्या सूचनेनुसार, अर्भकाला अहमदाबादच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी ही घटना घडली. पोलीस निरीक्षक के.डी. जडेजा यांनी तक्रारदाराचीही चौकशी सुरू असल्याचे सांगितले.