Delhi Girl Drag Case: नव्या वर्षाच्या पहिल्याचं दिवशी राजधानी पुन्हा हादरली! दिल्लीच्या रस्त्यावर तरुणीला ८ किमी फरफटत नेल

नव्या वर्षाच्या पहिल्याचं दिवशी तरुणी काहीतरी कामसाठी घराबाहेर पडली होती. दरम्यान एका कारने तिच्या स्कुटीला धडक दिली. तोच स्कुटीवरुन तरुणी खाली पडली आणि कारच्या चाकात अडकली पण कार चालकाने त्याची कार न थांबवता तरुणीस तब्बल ७ ते ८ किमी फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार राजधानी दिल्लीत घडला आहे.

Delhi Girl Drag Case: नव्या वर्षाच्या पहिल्याचं दिवशी राजधानी पुन्हा हादरली! दिल्लीच्या रस्त्यावर तरुणीला ८ किमी फरफटत नेल
Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

वर्षाच्या पहिल्याचं दिवशी राजधानी दिल्ली एक धक्कादायक घटना घडली आहे. दिल्लीच्या रस्त्यावर एक विचित्र अपघात घडला आहे. नव्या वर्षाच्या पहिल्याचं दिवशी तरुणी काहीतरी कामसाठी घराबाहेर पडली होती. दरम्यान एका कारने तिच्या स्कुटीला धडक दिली. तोच स्कुटीवरुन तरुणी खाली पडली आणि कारच्या चाकात अडकली पण कार चालकाने त्याची कार न थांबवता तरुणीस तब्बल ७ ते ८ किमी फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार राजधानी दिल्लीत घडला आहे. तरी या अपघातानंतर कारच्या चाकात अडकलेल्या तरुणीचा मृतदेह हा अर्धनग्न अवस्थेत आढळला असल्याने या अपघाताबाबत दिल्ली शहरात खळबळ माजली आहे. तरुणीचा मृतदेह बघता हा नेमका अपघात,अत्याचार की हत्त्या असे विविध प्रश्न उपस्थित होत आहेत.

 

अपघाताची ही घटना दिल्लीच्या सुलतानपुरी भागात घडली आहे. न्यू इयर पार्टीहून काही तरुण मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत येत होत. दरम्यान रस्त्यावर स्कुटीने जाणाऱ्या तरुणीस त्यांनी सुलतानपुरी या भागात धडक दिली. दरम्यान ती तरुणी स्कुटीवरुन खाली कोसळली आणि कारच्या चाकात अडकली. तोच कार चालकाने या तरुणीस दिल्लीतील कांजवालपर्यत फरफटत नेल. तरी पोलिसांना मात्र या तरुणीचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत सापडला आहे. पण अपघात एवढा भीषण होता आणि तरुणीस फरफटत नेल्याने कपडे फाटले असावे असं कार चालकाने म्हण्टलं आहे. (हे ही वाचा:- Sexual Harassment Case: लैंगिक छळाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर हरियाणाचे क्रीडा मंत्री Minister Sandeep Singh यांचा राजीनामा; म्हणाले- 'माझी प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न')

 

पण तरुणीचा मृतदेह ज्या अवस्थेत सापडला आहे त्यावरुन विविध शंका कुशंका उपस्थित होत आहे. तरी तरुणीच्या आईने हा केवळ अपघात नसुन आधी तरुणीवर अत्याचार केलेत आणि नंतर कार खाली चिरडून हत्या केल्याचे आरोप केले आहेत. तर दिल्ली पोलिस या घटनेचा सखोल तपास करत आहेत. तरी मृत तरुणी ही तिच्या घरातील एकटी कमावती मुलगी होती. दिल्ली शहरात ती इव्हेंट मॅनेजमेंटचं काम करत होती.

(The above story first appeared on LatestLY on Jan 02, 2023 09:10 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).