मुंबईमध्ये आज 599 नव्या कोरोना रुग्णांची भर, तर 20 जणांचा मृत्यू ; 9 नोव्हेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

10 Nov, 05:14 (IST)

मुंबईमध्ये आज 599 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली असून 20 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 507 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

10 Nov, 05:09 (IST)

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्कचा वापर करा असं आवाहन जो बायडन यांनी अमेरिकन नागरिकांना केलं आहे.

10 Nov, 04:08 (IST)

झारखंडमध्ये आज 246 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून 458 जणांची कोरोनावर मात केली आहे.

 

10 Nov, 04:08 (IST)

झारखंडमध्ये आज 246 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून 458 जणांची कोरोनावर मात केली आहे.

 

10 Nov, 03:46 (IST)

गोंदिया जिल्ह्यात आज नवे 51 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले. तर, 90 रूग्णांनी औषधोपचारातून कोरोनावर मात केल्याने त्यांना आज सुट्टी देण्यात आली. आतापर्यंत एकूण 10 हजार 379 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. ट्विट-

 

10 Nov, 03:25 (IST)

महाराष्ट्रात आज 3,277 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली असून राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता 17,23,135 इतकी झाली आहे.

 

10 Nov, 03:04 (IST)

युक्रेनियनच्या अध्यक्षांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

 

10 Nov, 02:43 (IST)

पश्चिम बंगालमध्ये 3907 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून 56 जणांचा मृत्यू झाला आहे.

 

10 Nov, 02:25 (IST)

कर्नाटकमध्ये 1,963 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून 19 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 2,686 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

10 Nov, 02:12 (IST)

हरियाणामध्ये आज 2,427 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून 7 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय 2151 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

10 Nov, 01:54 (IST)

मणिपूरमध्ये आज 182 नवे कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आला असून एकाचा मृत्यू झाला आहे.

 

10 Nov, 01:34 (IST)

दिल्ली: आज राजधानीच्या सदर बाजार भागात प्रचंड गर्दी दिसून आली.


 

10 Nov, 01:02 (IST)

राष्ट्रीय राजधानीत हवेची गुणवत्ता सतत खालावत असल्याने दिल्लीतील दृश्यमानता कमी होत आहे. विजय चौक आणि इंडिया गेट जवळील व्हिज्युअल.

 

10 Nov, 24:28 (IST)

दिलासादायक! मुंबईत कोरोना नियंत्रणात येत असून प्रतिबंधित क्षेत्रांच्या संख्येतही झपाट्याची घट होत आहे.

09 Nov, 23:54 (IST)

उत्तराखंडः राज्य सरकारने इंटरमीडिएट परीक्षांबाबत अर्ज सादर करण्याच्या अंतिम तारखांमध्ये सुधारणा केली.

09 Nov, 23:52 (IST)

रयत शिक्षण संस्थेतर्फे मुख्यमंत्री सहायता निधी-कोविडकरिता शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे निधी सुपूर्द केला.

 

09 Nov, 23:40 (IST)

आत्महत्येसारखे अघोरी पाऊल  कर्मचाऱ्यांनी उचलू नये, असं आवाहन मंत्री अनिल परब यांनी केलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांना 2 महिन्याच्या वेतनापैकी एक वेतन दिवाळीपूर्वी देण्यात येणार असून, 1 महिन्याचे वेतन देण्यासाठी शासनाकडे निधीची मागणी केली आहे.

09 Nov, 23:08 (IST)

बिहार: भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते बिहार निवडणुकांच्या मतमोजणीच्या आधी वितरणासाठी मिठाई तयार करत आहेत.पहा फोटो

09 Nov, 22:47 (IST)

डीआरडीओ मुख्यालयात आज संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी राष्ट्रीय तंत्रज्ञानाच्या प्रगतीचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणार्‍या अँटी-सॅटेलाइट क्षेपणास्त्र प्रणालीच्या मॉडेलचे उद्घाटन केले.

09 Nov, 22:16 (IST)

पश्चिम बंगाल मध्ये अत्यावश्यक वस्तूंचे दर कमी करण्यासाठी ममता बॅनर्जी यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे.

Read more


देशभरात कोरोना व्हायरसची परिस्थिती अद्याप कायम असून दिल्लीकरांची अधिकच चिंता वाढली आहे. कारण तेथे रुग्णांच्या संख्येत तुफान वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तर दुसऱ्या बाजूला दिल्लीतील हवेची गुणवत्ता ही अधिक बिघडत चालली आहे. त्यामुळे दिल्लीतील विविध परिसरात धुक्याची चादर पसरल्याचे दिसून आले आहे. पण अशा पद्धतीचे वातावरण कोरोनाच्या काळात नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकते. दिल्लीतील आनंद विहार येथे AQI ची 484 नोंद, मुंडका मध्ये 470, ओखला 464 फेज 2 आणि वाझीपूर येथे 468 नोंद करण्यात आल्याची माहिती CPCB कडून देण्यात आली आहे.

तसेच महाराष्ट्रात कोरोना व्हायरसची परिस्थिती काही प्रमाणात नियंत्रणात आणण्यात यश आले असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी जनतेशी संवाद साधताना म्हटले आहे. तसेच अवघ्या काही दिवसांवर आलेल्या दिवाळीच्या शुभेच्छा सुद्धा दिल्या. पण दिवाळीच्या काळात प्रदुषण टाळण्याचे सुद्धा आवाहन त्यांनी केले आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वारणसी, उत्तर प्रदेश येथे विविध प्रकल्पांचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उद्घाटन करणार आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now