मध्यप्रदेश: मुख्यमंत्री कमलनाथ यांनी मंत्रिमंडळातील 16 मंत्र्यांचे राजीनामे घेतले; 9 मार्च 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

मुंबईतील भायखाळा येथे आग लागल्याची घटना समोर येत आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे त्यांचे प्रयत्न सुरु आहेत.

10 Mar, 05:21 (IST)

मध्यप्रदेशमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला असून, मुख्यमंत्री कमलनाथ यांनी आपल्या मंत्रिमंडळातील सुमारे 16 मंत्र्यांचे राजीनामे घेतले आहेत.

10 Mar, 04:42 (IST)

महाराष्ट्रात कोरोनाचे पहिले दोन रुग्ण सापडले. दोन्ही रुग्णांवर पुणे येथील नायडू रुग्णालयात उपचार सुरु.

10 Mar, 04:26 (IST)

शहरात साजऱ्या होणाऱ्या होळी सणादरम्यान कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी मुंबई पोलीस सज्ज आहेत. अनुचीत प्रकार टाळण्यासाठी सुमारे 40 हजारांहून अधिक पोलीस कर्मचारी मुंबईच्या रस्त्यांवर बंदोबस्तासाठी तैनात आहेत. 

10 Mar, 04:04 (IST)

एशियन क्वालिफायरच्या उपांत्य फेरीत प्रवेश करून एमसी मेरी कोमने फिलीपिन्सच्या बॉक्सर आयरिश मॅग्नोला 5-0 ने पराभूत केले. जॉर्डनच्या अम्मान येथे रंगला सामना.

एएनआय ट्विट

10 Mar, 03:32 (IST)

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला होळी आणि धुलिवंदनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. जगभरात चिंतेच कारण ठरलेल्या #coronavirus चा आपल्याकडे प्रादूर्भाव आढळलेला नाही. मात्र, सुरक्षिततेचा उपाय म्हणून सर्वांनी काळजी घ्यावी व आरोग्यदायी पद्धतीनं उत्सवाचा आनंद लुटावा असं अवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.

ट्विट

10 Mar, 03:11 (IST)

भोपाळ: मध्य प्रदेशचे मुख्य सचिव एसआर मोहंती मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या निवासस्थानी पोहोचले . मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे.

10 Mar, 02:55 (IST)

मुंबईः  येसबँकचे संस्थापक राणा कपूर यांनी खरेदी केलेले माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या चित्रकला ईडीने जप्त केले. जून २०१० मध्ये प्रियंका गांधी वड्रा यांनी कपूर यांना लिहिलेल्या पत्राद्वारे २ कोटी रुपयांच्या पेंटिंगची विक्री झाल्याची पुष्टी केली गेली. चित्रकला ईडी कार्यालयात आणली गेली आहे.

10 Mar, 02:18 (IST)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून जनतेला होलिकोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पर्यावरणपूरक होळी साजरी करून धुळवडीचा आनंद साजरा करावा, असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

 

 

10 Mar, 02:15 (IST)

श्रीरामपूर येथे रेल्वे पोलिस उपनिरीक्षकाने आत्महत्या केली आहे. मिनीचंद मिना, असं या पोलिस उपनिरीक्षकाचं नाव आहे. मिनीचंद हे रेल्वेसुरक्षा दलात कार्यरत होते. त्यानी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप समजू शकलेलं नाही. या प्रकरणी श्रीरामपूर पोलिसांनी पंचनामा केला.

 

10 Mar, 01:56 (IST)

जेष्ठ पत्रकार अनंत दीक्षित यांचे पुणे येथे रुग्णालयात निधन झाले आहे. महाराष्ट्राने आज एक जाणता आणि अभ्यासू संपादक गमवला आहे.  (अधिक माहितसाठी वाचा -  पुणे: ज्येष्ठ पत्रकार, माजी संपादक अनंत दीक्षित यांचे निधन)

10 Mar, 01:23 (IST)

चंद्रपूर, परभणी, हिंगोलीत ढगाळ वातावरणासह मुसळधार पाऊस पडला आहे. तसेच विदर्भात वादळी पाऊस आणि गारपिट होण्याचा इशाराही हवामान विभागाने वर्तवला आहे. मध्य प्रदेश ते तमिळनाडूच्या भागामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे राज्यात पावसाळी वातावरण निर्माण झालं आहे. मराठवाड्यातील काही भागातदेखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 

 

10 Mar, 24:46 (IST)

मनसेचे नेते आणि कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अॅट्रॉसिटी प्रकरणात औरंगाबादच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने हर्षवर्धन जाधव यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. त्यामुळे त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.

 

10 Mar, 24:10 (IST)

करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद महापालिकेची निवडणूक पुढे ढकलावी, अशी मागणी एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी केली आहे. तसेच जोपर्यंत निवडणूक होत नाही तोपर्यंत महापालिकेवर प्रशासक नेमण्यात यावा, अशीदेखील मागणी जलील यांनी केली आहे. 

 

09 Mar, 23:35 (IST)

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शरद पवार यांचा नाशिक दौरा आता रद्द करण्यात आला आहे. तसेच कळवण तालुक्यातील शेतकरी मेळावाही रद्द करण्यात आला आहे. नाशिक मध्ये कोरोनाचे 4 संशयित रुग्ण आढळले होते. त्यांची तपासणी निगेटिव्ह आली आहे. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून शरद पवार यांनी हा निर्णय घेतला आहे.

 

09 Mar, 23:35 (IST)

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शरद पवार यांचा नाशिक दौरा आता रद्द करण्यात आला आहे. तसेच कळवण तालुक्यातील शेतकरी मेळावाही रद्द करण्यात आला आहे. नाशिक मध्ये कोरोनाचे 4 संशयित रुग्ण आढळले होते. त्यांची तपासणी निगेटिव्ह आली आहे. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून शरद पवार यांनी हा निर्णय घेतला आहे.

 

09 Mar, 22:56 (IST)

कोरोना व्हायरसचा संशयित रुग्ण कर्नाटकात रुग्णालयातून पळून गेल्याची घटना घडली आहे. कर्नाटक पोलिस या रुग्णाचा शोध घेत आहेत. हा रुग्ण दुबईहून परतला होता. त्यावेळी त्याच्यात ताप आणि इतर लक्षणं आढळली होती. म्हणून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु, आज हा रुग्ण रुग्णालयातून पळून गेला आहे.  

 

09 Mar, 22:50 (IST)

मुख्यमंत्री कमलनाथ यांनी आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. दिल्लीत झालेल्या या बैठकीत सोनिया गांधी आणि कमलनाथ यांच्यात मध्यप्रेदशात निर्माण झालेल्या राजकीय पेचावर चर्चा झाली. यावेळी कमलनाथ यांनी सोनिया गांधी यांना काँग्रेसचे सर्व आमदार परतल्याची माहिती दिली. 

 

09 Mar, 21:34 (IST)

आज मुंबई शेअर बाजारमध्ये सेन्सेक्स 1941.67 अंकांच्या घसरणीनंतर 35,634.95 वर बंद झाला आहे.दरम्यान आज दिवसभरात मोठी घसरण पहायला मिळाली. 2000 पेक्षा अधिक अंकांनी घसरलेला सेनेक्स बाजार बंद होण्याच्या वेळेस थोडा सावरताना दिसला. मुंबई शेअर बाजारात मोठी घसरण, 2342 अंकांनी घसरला सेन्सेक्स; कोरोना व्हायरस, Yes Bank आर्थिक संकंटाचा परिणाम.

 

09 Mar, 21:12 (IST)

कॉंग्रेस नेते मुकुल वाससिक यांनी आज पत्रकारांना दिलेल्या माहितीमध्ये केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, कपिल मिश्रा, परवेश वर्मा यांच्या विरोधात दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान प्रक्षोभक भाषणं केल्याप्रकरणी FIR दाखल करण्याची मागणी  केली आहे. तर याप्रकरणासाठी उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांची judicial inquiry चीदेखील मागणी केली आहे.

09 Mar, 20:35 (IST)

कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढल्यास आयसोलेशन वॉर्ड, रुग्णांना अलिप्त ठेवण्याची सोय, डॉक्टरांची उपलब्धता तसंच इतर खबरदारी घेण्याविषयी दिल्ली सरकारशी चर्चा केल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरिवाल यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

 

Read more


मुंबईतील भायखाळा येथे आग लागल्याची घटना समोर येत आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. या आगीत कोणतीही हानी झाल्याचे वृत्त अद्याप हाती आलेले नाही.

आज (9 मार्च) देशात सर्वत्र होळीचा उत्साह पाहायला मिळेल. देशातील विविध भागात होळी साजरी करण्याची पद्धत वेगवेगळी असली तरी होळीचा असली तरी होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जाईल. होळी पाठोपाठ येणाऱ्या धुलिवंदन आणि रंगपंचमी या सणांवर मात्र यंदा कोरोना व्हायरसचे सावट राहील. त्यामुळे रंग, पिचकाऱ्या यांच्या खरेदीकडे नागरिकांनी पाठ फिरवली आहे.

त्याचबरोबर यंदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापनदिन मेळाव्याचे पहिल्यांदाच मुंबई बाहेर आयोजन करण्यात आले आहे. मनसेचा चौदावा वर्धापनदिन यंदा नवी मुंबईतील वाशी येथे पार पडणार आहे. या प्रसंगी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह मनसेचे इतर नेतेही उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात मनसेच्या शॅडो कॅबिनेटची घोषणा होणार आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

(Maharashtra Weather Update: उन्हाळा लांबणीवर; विदर्भात 10 ते 12 मार्च मध्ये पावसाचा इशारा)

होळीनंतर साधारणपणे उन्हाळ्याला सुरुवात होते. मात्र यंदा उन्हाळा लांबणीवर पडला असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी सध्या ढगाळ असून अनेक भागात रात्री गारवा जाणवतो. त्याचबरोबर विदर्भात वादळी पाऊस आणि गारपीट होण्याचा इशारा हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now