आसाममध्ये आज 568 नव्या कोरोना रुग्णांची नोंद ; 9 जुलै 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

10 Jul, 05:30 (IST)

आसाममध्ये आज 568 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

 

10 Jul, 05:17 (IST)

उत्तर प्रदेश च्या चांदौली जिल्ह्यात कानपूर हल्ल्याला समर्थन देणाऱ्या एकाल अटक करण्यात आली आहे. कानपूर हल्य्यात 8 पोलिस ठार झाले होते. त्यानंतर या आरोपीने या हल्ल्याचे समर्थन करत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर आक्षेपार्ह भाष्य केले होते.

 

10 Jul, 05:11 (IST)

वरिष्ठ आयएएस अधिकारी जी नरेंद्र कुमार यांची दिल्लीचे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

10 Jul, 04:50 (IST)

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सीईओ राहुल जोहरी यांचा राजीनामा बीसीसीआयने स्वीकारला आहे. त्यांनी काही महिन्यांपूर्वी राजीनामा सादर केला होता.

 

10 Jul, 04:41 (IST)

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील राजगृहाच्या आवारात तोडफोड केल्याप्रकरणी आज आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. उमेश सीताराम जाधव असं या आरोपीचं नाव आहे.

 

10 Jul, 04:10 (IST)

किंग एडवर्ड मेमोरियल (KEM) इस्पितळात दाखल झालेल्या 20 वर्षीय रूग्णाने  गळफास लागून आत्महत्या केली आहे. तो कोरोना विषाणूपासून बरा झाला होता, मात्र त्याला रक्ताच्या कर्करोगाने ग्रासले होते. बृहन्मुंबई महानगरपालिकेने याबाबत माहिती दिली आहे.

 

10 Jul, 03:47 (IST)

पुणे शहरात आज नव्याने 1,006 कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले आहेत. यामध्ये  नायडू-महापालिका रुग्णालये 539, खासगी 455 आणि ससूनमधील 12  रुग्णांचा समावेश आहे. आजच्या 1,006 रुग्णांसह पुणे शहरातील एकूण संख्या आता 25,174 इतकी झाली आहे.

10 Jul, 03:38 (IST)

विक्रोळी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन पाटील यांचा यांचा मृत्यू. ते कोरोना व्हायरसशी झुंज देत होते. मुंबई पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे.

10 Jul, 03:21 (IST)

कशेडी घाटात दरड कोसळली असून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग रात्रभर ठप्प राहणार आहे.

10 Jul, 02:46 (IST)

मुंबईमध्ये आज 1,282 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून 68 रुग्णांचा मृत्यू झाली आहे. त्यामुळे मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 88,795 वर पोहचली आहे.

 

10 Jul, 02:28 (IST)

राज्याच्या जलसंपदा क्षमतेचा आढावा घेऊन जलविद्युत प्रकल्पाची क्षमता कशी वाढविता येईल यासंदर्भात ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्यात एक बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत जलविद्युत निर्मिती वाढविणार; कोयना-येलदरी सह राज्यातील जलविद्युत प्रकल्पांच्या नूतनीकरणाचा निर्णय घेण्यात आला.

10 Jul, 02:13 (IST)

मध्य प्रदेशातील रीवा येथे उभारण्यात आलेला 750 मेगावॅट क्षमतेचा सौर प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला उद्या समर्पित करतील. 2022 पर्यंत 175 GW इतक्या उर्जा क्षमतेचे लक्ष्य गाठण्याचे भारताच्या वचनबद्धतेचे प्रकल्पाचे लक्ष्य.

10 Jul, 01:46 (IST)

MUTP3 मधील प्रकल्पांना चालना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राज्य शासन, मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन, MMRDA आणि सिडको यांच्यात सामंजस्य करार झाला आहे, अशी माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

10 Jul, 01:24 (IST)

कोरोना व्हायरस संकटामुळे एशिया चषक स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे श्रीलंका क्रिकेट असोसियेशन या स्पर्धेचे वेळापत्रक 2021 साठी पुन्हा नव्याने आखणार आहे.

 

10 Jul, 01:11 (IST)

महाराष्ट्रात आज दिवसभरात 6875 जण कोरोना संक्रमित आढळले आहेत. उपचार घेऊन बरे झाल्याने आज दिवसभरात 4067 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तर 219 जणांचा मृत्यू झाला. राज्यातील एकूण कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या 2,30,599 इतकी झाली आहे. यात उपचार घेऊन बरे झाल्याने डिस्चार्ज मिलालेल्या 1,27,259, प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या 93,652 आणि मृत्य झालेल्या 9,667  जणांचाही समावेश आहे.

10 Jul, 24:52 (IST)

कोरोना व्हायरस संकट काळात महाराष्ट्र पोलिसांकडून 1 लाख 56 हजार गुन्हे दाखल, 29 हजार 793 जणांना अटक करण्यात आली आहे. तर, 29 हजार 793 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांकडून अत्यावश्यक सेवेसाठी 5 लाख 69 हजार 400 ई-पासचे वितरण. करण्यात आले आहे. 126पोलीस अधिकाऱ्यांना COVID_19 संसर्ग झाला आहे. 1027 कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत. तर 71 पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

10 Jul, 24:32 (IST)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना मंत्र्यांची एक बैठक सरकारी निवासस्थान वर्षा येथे बोलावली आहे. या बैठकीला एकनाथ शिंदे, अनिल परब, शंभूराजे देसाई, आदित्य ठाकरे आदी मंत्री उपस्थित असल्याचे समजते. तर काही मंत्री व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे सहभागी होणार असल्याचे वृत्त.

10 Jul, 24:29 (IST)

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा या दिल्ली येथील लोधी इस्टेट येथील बंगला महिना अखेरीस सोडतील असे वृत्त प्रसारमाध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.

09 Jul, 23:54 (IST)

कानपूर एन्काउंटर प्रकरणातील आरोपी विकास दुबे याला उज्जैन येथे अटक करण्यात आली. त्यानंतर देशभरात राजकारण तापले आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री, बसपा सर्वेसर्वा मायावती यांनी विकास दुबे याच्यासोबतच त्याला मदत करणाऱ्यांवरही कारवाई करा अशी मागणी केली आहे.

09 Jul, 23:25 (IST)

तुम्ही कोरोनावर यशस्वीपणे मात केली असेल तर आता वेळ आली आहे इतर रुग्णनांना मदत करण्याची. जर आपण कोरोनापासून बरे झाले असाल तर रक्तद्रव (प्लाझ्मा) दान करून कोव्हिड रुग्णांचे प्राण वाचवू शकता. नोंदणी करण्यासाठी http://plasmayoddha.in ला भेट द्या, असे अवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.

Read more


देशभरात कोरोना व्हायरसचा विळखा अधिक घट्ट होताना दिसून येत आहे. त्यामुळे दिवसागणिक कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होण्यासोबत बळींचा ही आकडा वाढत आहे. देशातील कोरोनाच्या परिस्थिती बाबात बोलायचे झाल्यास आकडा 7 लाखांच्या पार गेला आहे. कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी लसी संदर्भात संशोधन करण्यात येत आहे. दुसऱ्या बाजूला आता पावसाला सुद्धा विविध ठिकाणी सुरुवात झाल्याने साथीच्या रोगाची चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वत:सह परिवाराची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

अमेरिकेत कोरोनाबाधितांचा आकडा 3 मिलियनच्या पार गेला आहे. तसेच आतापर्यंत 131,000 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटी यांनी माहिती दिली आहे. (Coronavirus: चीनमुळेच जगातील अनेक देशांची आर्थिक घडी विस्कटली; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा आरोप)

भारतीय सैन्याने  आपल्या सैनिकांना स्मार्टफोनमधून 89 अॅप्स हटविण्याच्या सूचना दिल्या आहेत. सैन्याच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लष्करातून बाहेर पडणारी माहिती रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या अ‍ॅप्समध्ये टिक टॉक (TikTok), ट्रू कॉलर (Truecaller) आणि इंस्टाग्राम (Instagram) इत्यादींची नावे आहेत.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी येत्या काही दिवसात राज्यात जिम सुरु करण्याची शक्यता व्यक्त केली आहे. तर एएनआय यांनी ट्वीट करत असे म्हटले आहे की, हॉटेल्स सुरु करण्यात आले आहेत.  त्या्मुळे आता जिम सुद्धा पुन्हा सुरु करण्याचा विचार राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. परंतु त्यावेळी सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचे पालन करावे अशी अट लागू असणार असल्याचे ही टोपे यांनी स्पष्ट केले आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now