जल शक्ती मंत्रालयाच्या जल जीवन मिशन अंतर्गत आतापर्यंत देशभरात 2 कोटींहून अधिक घरांना नळपाणी जोडणी देण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे.
जल शक्ती मंत्रालयाच्या जल जीवन मिशन अंतर्गत आतापर्यंत देशभरात 2 कोटींहून अधिक घरांना नळपाणी जोडणी; 8 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
पूर्व लडाख सेक्टरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) वर पुन्हा आज गोळीबार झाल्याची घटना घडल्याचे समजत आहे. मागील तीन महिन्यांपासून भारत आणि चीनची सैन्य याठिकाणी एकमेकांंसमोर उभे ठाकले आहेत. चीन सैन्य हे LAC ओलांंडत असल्याचे भारताकडुन सांंगण्यात येत असताना चीनच्या ग्लोबल टाईम्स ने भारतीय जवानांंनीच LAC ओलांंडल्याचा दावा केला आहे. यापुर्वी भारतातील चीन दुतावासाने सुद्धा असाच आरोप लगावला होता.
दुसरीकडे, कोरोनावरील संभाव्य लस म्हणजेच कोव्हॅक्सिन ची दुसरी क्लिनिकल चाचणी भारतात सुरु झाली आहे, भारत बायोटेक निर्मित या लसीचा डोस 12 ते 65 वयोगटातील 300 प्रतिनिधींंना देण्यात येणार आहे यापैकी 15 जणांंचे स्क्रीनिंंग पुर्ण झालेय. उद्या सकाळपर्यंत लस मिळाल्यावर हा डोस दिला जाईल आणि पुढील चार दिवस या प्रतिनिधींंना निरिक्षणाखाली ठेवले जाईल.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
दरम्यान आज महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी भाजप विरुद्ध शिवसेना असा थेट सामना रंगणार आहे. शिवसेनेकडून नीलम गोऱ्हे यांनी अर्ज भरला असून भाजपतर्फे भाई गिरकर यांनी अर्ज भरला आहे.