फ्लिपकार्ट'च्या तंत्रप्रणालीमध्ये मराठी भाषेचा समावेश झाल्यानंतर मनसेकडून 'अशी' प्रतिक्रिया ; 8 जानेवारी 2021 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दणक्यानंतर 'फ्लिपकार्ट'च्या तंत्रप्रणालीमध्ये मराठी भाषेचा समावेश. महाराष्ट्रात 'राज'भाषेचा सन्मान राखला गेलाच पाहिजे! अशा आशयाचे ट्विट मनसेच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून करण्यात आले आहे. ट्विट-
1 वर्षाच्या चिमुकलीचे अपहरण झाल्यानंतर 48 तासांत मुंबई पोलिसांनी तिचा शोध घेऊन तिला तिच्या आई-वडिलांकडे सोपवले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या कामगिरी बद्दल शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी मुंबई पोलिसांचे कौतूक केले आहे. ट्विट-
रायगड मध्ये कुडपान गावात व-हाडाचा ट्रक 300 फूट दरीत कोसळला असून 30-40 जण जखमी झाले आहेत. तसेच चौघांचे मृतदेह बाहेर काढले असून बचावकार्य अद्याप सुरु आहेत. ABP माझाने याबाबत वृत्त झाले आहे.
महाराष्ट्रात आज दिवसभरात 3693 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून 2890 कोरोनाच्या रुग्ण बरे होऊन त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामुळे कोरोना बाधितांची एकूण संख्या 19,61,975 इतकी झाली आहे. तर बरे झालेल्या रुग्णांची संख्या 18,58,999 इतकी झाली आहे.
उत्तराखंडमध्ये आज दिवसभरात 390 कोरोनाचे रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत एकूण 87,127 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. तर 269 नवे रुग्ण बरे झाले असून 7 रुग्ण दगावले आहेत. यामुळे एकूण कोरोना बाधितांची एकूण संख्या 93,111 वर पोहोचली असून 1562 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
नव्या कृषी विधेयकं विरोधात शेतक-यांनी पुकारलेल्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी येत्या 15 जानेवारीला केंद्र सरकार आणि शेतकरी नेते यांच्यात चर्चा होणार आहे.
हरियाणा मधील पाच पोल्ट्री फार्म मधील 1.60 लाखांहून अधिक पक्ष्यांची चाचणी केली असता त्यामधील काहींना बर्ड फ्लू ची लागण झाल्याची कृषीमंत्री दे पी दलाल यांनी माहिती दिली आहे.
अमेरिकेतील संसद कॅप्टॉलच्या बाहेर गुरुवारी डोनाल्ड ट्रंम्प यांच्या कार्यकर्त्यांनी धुडगूस घातल्यानंतर त्या घटनेचे प्रतिसाद सर्वत्र उमटले गेले. तसेच डोनाल्ड ट्रंम्प यांनी अखेर आपला पराभव स्विकारुन येत्या 20 जानेवारीला अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांना शांतिपूर्ण आणि सुव्यवस्थेने सत्ता हस्तांतरित करणार असल्याचे म्हटले आहे. कालच्या प्रकारावरुन डोनाल्ड ट्रंम्प यांनी सर्व अमेरिकन प्रमाणेच मी सुद्धा हिंसाचार करत संताप व्यक्त केल्याचे म्हटले आहे. तर संसदेत कार्यकर्त्यांकडून घालण्यात येणाऱ्या धुडगूसीवर नियंत्रण मिळण्यासाठी मी राष्ट्रीय संरक्षक आणि फेडरल कायद्याची अंमलबाजवणी करणाऱ्यांनी तेथे तैनात केले. पुढे डोनाल्ड ट्रंम्प यांनी अमेरिका नेहमीच कायदा व सुव्यस्था राखणारे राष्ट्र असले पाहिजे असे ही त्यांनी म्हटले.
केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सुचनांनुसार आज महाराष्ट्रातील 30 जिल्ह्यांसह 25 महापालिका क्षेत्रात कोरोनावरील लसीकरणाचे ड्राय रन होणार आहे. या संदर्भात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अधिक माहिती देत असे म्हटले की, प्रत्येक जिल्ह्यातील तीन आरोग्य केंद्रे आणि महानगरपालिका क्षेत्रातील एक आरोग्य केंद्रावर ड्राय रन पार पाडले जाणार आहे. याआधी सुद्धा राज्यातील पुणे, नंदुरबार, जालना आणि नागपूरसह अन्य काही ठिकाणी ड्रान रन केले गेले.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
कर्नाटक मधल डॉक्टरांच्या क्वार्टर्समध्ये बिबट्या दिसून आल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले आहे. तर रात्रीच्या वेळची ही घटना असून तो क्वार्टर्समध्ये मुक्तपणे फिरताना दिसल्याने आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)