7th Pay Commission: नव्या वर्षात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात बंपर वाढ होणार? केंद्र सरकार घेणार मोठा निर्णय
तरी या नव्या वर्षात केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना वाढीव पगार मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
प्रत्येक कर्मचारी वर्षाला आपल्या पगारात वाढ व्हावी अशी अपेक्षा असते. खासगी कर्मचारी असो वा सरकारी पण प्रत्येकाला त्याच्या पगार भत्त्यात वाढ हवी असते. तरी या नव्या वर्षात केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना वाढीव पगार मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. किंबहूना या संबंधीत लवकरचं केंद्र सरकार मोठा निर्णय घेणार असल्याची चर्चा आहे. तरी यावर्षात केंद्रीय कर्मचाऱ्यांना वाढीव पगार मिळाल्या हे या कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठं नवीन वर्षाचं गिफ्ट असेल. कोरोनामुळे गेल्या अठरा महिन्यांपासून केंद्र सरकार कर्मचाऱ्यांची डीए वाढ रखडली आहे. तरी यावर्षीच्या अर्थसंकल्पात केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. या निर्णयानुसार केंद्र सरकार कर्मचाऱ्यांची डीए वाढ आणि थकीत महागाई भत्ता देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यानुसार कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होऊन त्यांना आर्थिक बळ मिळेल.
२०२३ या वर्षात केंद्र सरकार कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ ते ५ टक्क्यांनी वाढ अपेक्षित आहे. सरकारने महागाई भत्त्यात वाढ केल्यास कर्मचाऱ्यांच्या पगारात बंपर वाढ होईल. तरी गेल्या वर्षात म्हणजेच २०२२ मध्ये केंद्र सरकारने महागाई भत्ता ४ टक्क्यांनी वाढवला होता त्यानंतर एकूण महागाई भत्ता ३४ वरून ३८ टक्क्यांवर पोहोचला. तरी यावर्षी महागाई भत्ता ३ ते ५ टक्क्यांनी वाढवल्यास महागाई भत्ता ४० ते ४२ टक्के होण्याची संभावना आहे. (हे ही वाचा:- Increment In Pension By EPFO: नव्या वर्षात EPFO पेन्शन धारकांना वाढीव पेन्शन मिळणार, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचा मोठा निर्णय)
तसेच केंद्र सरकार पेंशन धारकांना देखील वाढीव पेंशन मिळणार असण्याची दाट शक्यता आहे. सध्या पेन्शनधारकांना मूळ वेतनावर ३८ टक्के महागाई सवलत दिली जात असून २०२३ मध्ये ही महागाई सवलत ४३ टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. तरी पाच टक्क्यांनी ही वाढीव सवलत मिळाल्यास पेंशन धारकांच्या पेंशनमध्ये देखील मोठी वाढ होवू शकते. २०२३ हे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी खरचं २०२३ हे न्यू इयर हॅपी न्यू इयर ठरु शकतं.